शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोल्हापूर: माणगांवमध्ये आगीचे सञ सुरूच, १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी; शेतकरी भयभयीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:35 PM

माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची घेतली गंभीर दखल

अभय व्हनवाडेरूकडी-माणगाव: माणगांव येथील  सरळी नामक शेतातील २५ एकर उसाला रविवारी (दि ३०) आग लागल्याची घटना ताजी असताना आज, मंगळवारी पुन्हा १६ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात अंदाजे ४ लाखांचे नुकसान झाले. आगीच्या प्रकारामुळे शेतकरी भयभयीत झाले आहेत. विनाकारण ऊसाना आगी लावण्याच्या सञामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे.हंगाम सुरु झालेला असतानाच ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. त्यातच अदयाप सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उस कोठे द्यायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यातच परतीच्या पाऊसामुळे जमिनीत ओलावा असल्याने शेतातून ट्रक्टर ट्रॉली बाहेर काढण्यासाठी कसरत सह नुकसानीचे ठरत आहे. कारखाना घोषित  केलेल्या दरामध्ये जळीत उसाला टनामागे ४०० ते ५०० रूपये कमी दर मिळत असल्याने उत्पादकाचे लाखोंचे  नुकसान होत आहे.दरम्यान, माणगांव ग्रामपंचायतीने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने उसतोडीनंतर पाला पेटवून इतर शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार राहणाऱ्या गुन्हेगाराची गोपनीयरीत्या माहिती पोलीस स्टेशनला कळविण्यात येणार आहे. तसेच नुकसान भरपाई मिळावे यासाठी ग्राहक न्यायालय, राज्य वीज नियमक आयोगसह उच्य न्यायालयाकडे नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिध्दीपञकाद्वारे दिली आहे. या प्रसिध्दी पञकावर सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदारसह ग्रामपंचायत  सदस्यांच्या सह्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfireआग