ठळक मुद्देसंकेश्वर आगाराला दोन दिवसात १६ लाखांचा फटका
संकेश्वर :कर्नाटक शासनाने मार्ग परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्यातील इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने नियमित सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता न दिल्याने कर्नाटक परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवार (१२) पासून संप पुकारला आहे.
रविवारी (१३) दुसऱ्या दिवशीही संप सुरू असून संपामुळे आगाराला दोन दिवसात १६ लाखाचा फटका बसला आहे. संकेश्वर आगारातील ५५ बसेसच्या २०२ फेऱ्या बंद झाल्याने १६ लाखाचे नुकसान झाले आहे. संपात ३५७ चालक व वाहक सहभागी झाले आहेत.