कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शनिवारी, अखेरच्या दिवशी जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी ९७८ व आतापर्यंत १६८५, तर नगराध्यक्षपदासाठी ७२ व आतापर्यंत १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाल्याने अर्जांची तुफान गर्दी झाल्याचे चित्र होते. निवडणूक आयोगाने आॅनलाईनबरोबर आॅफलाईनचाही पर्याय दिल्याने अर्ज भरताना यांचा सर्रास वापर झाला.नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरायला २४ आॅक्टोबरला सुरुवात झाली. पहिले दोन दिवस अर्ज भरण्यासाठी इच्छुकांचा थंडा प्रतिसाद राहिला. त्यानंतर हळूहळू यात भर पडली. शनिवारी अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली. दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीचा वापर झाला. उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात गर्दीच गर्दी झाल्याचे दिसत होेते. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्ह्णातील नगरपलिकांमध्ये नगरसेवकपदासाठी शनिवारी ९७८ व आतापर्यंत १६८५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यात इचलकरंजीमध्ये सर्वाधिक ३५७ व (आतापर्यंत ४३२), कागलमध्ये १३६ (१६८), जयसिंगपूरमध्ये १२८ (२३४), कुरुंदवाडमध्ये ८० (१२७), वडगावमध्ये ७६ (७९), मलकापूरमध्ये ३४ (६५), पन्हाळ्यामध्ये ३९ (६०), कागलमध्ये १३६ (३०४), मुरगूडमध्ये ४३ (१६८), गडहिंग्लजमध्ये ८५ (२१६) अर्जांचा समावेश आहे.तसेच नगराध्यक्षपदासाठी जिल्ह्णात शनिवारी एकूण ७२ व आतापर्यंत १३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये इचलकरंजी येथे १४ (१७), जयसिंगपूर येथे ६ (१२), कुरुंदवाड येथे ५(१२), वडगाव येथे ७ (७), मलकापूर येथे १ (५), पन्हाळा येथे ४ (६), कागल येथे १६ (४०), मुरगूड येथे १० (२२), गडहिंग्लज येथे ९ (१७) अर्जांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईनसह आॅफलाईनचाही वापरनगरसेवकपदासाठी अर्जनगरपालिकाशनिवारीएकूणइचलकरंजी३५७४३२जयसिंगपूर१२८२३४कुरुंदवाड८०१२७वडगाव७६७९मलकापूर३४६५पन्हाळा३९६०कागल१३६३०४मुरगूड४३१६८गडहिंग्लज८५२१६नगराध्यक्षपदासाठी अर्जनगरपालिकाशनिवारी एकूणइचलकरंजी१४१७जयसिंगपूर०६१२कुरुंदवाड०५१२वडगाव०७०७मलकापूर०१०५पन्हाळा०४०६कागल१६४०मुरगूड१०२२गडहिंग्लज०९१७
नगरसेवकपदासाठी १६८५ अर्ज दाखल
By admin | Published: October 30, 2016 1:17 AM