शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

१६९ कोटींची मागणी गैर

By admin | Published: September 25, 2014 12:48 AM

हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले

कोल्हापूर : ‘आयआरबी’ने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे ‘२८ सप्टेंबर २०११ ते १५ जून २०१४ पर्यंत विविध कारणांनी टोलवसुली बंद राहिल्याने १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा झालेला तोटा भरून द्यावा,’ असा दावा केला आहे. हा दावा म्हणजे, ‘२५ कोटींचा दरोडा घालणार होतो; पण प्रत्यक्षात १० लाख रुपयेच मिळाले,’ असा दरोडेखोराने योजलेला अंदाज आहे, अशा शब्दांत ‘आयआरबी’च्या मागणीची खिल्ली उडविली. टोलवसुलीच बेकायदेशीर आहे; त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच येत नाही, असा दावा अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी केला. आज, बुधवारी टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात दोघे बोलत होते. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही राज्य शासन व न्यायालयाने दिलेली टोलवसुलीस स्थगिती, आंदोलन व कायदा सुव्यवस्थेमुळे टोलवसुलीवर झालेला परिणाम यांमुळे टोलवसुलीत १६९ कोटी ५१ लाख रुपयांचा तोटा झाला आहे. तोट्याची रक्कम तर द्या किंवा या रक मेच्या भरपाईसाठी टोलवसुलीची मुदत तरी वाढवा, अशा आशयाची नोटीस ‘आयआरबी’ने १७ सप्टेंबर २०१४ रोजी रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना बजावली आहे. या नोटिसीचा व ‘आयआरबी’च्या मागणीचा एन. डी. पाटील व पानसरे यांनी खरपूस समाचार घेतला.पानसरे म्हणाले, आयआरबी बेकायदेशीर टोलवसुलीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच बिनबुडाची अवाजवी मागणी करीत आहे. मूल्यांकन समितीच्या अहवालाबाबत कृती समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच टोलची स्थगिती उठवू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृती समितीला दिले होते. मात्र, ५ जानेवारी २०१२ रोजी दिलेली स्थगिती परस्परच १३ मे २०१३ रोजी उठविली गेली. दरम्यान, कृती समितीशी ना चर्चा केली, ना मूल्यांकनाचा अहवाल जाहीर केला. कोणत्या कारणावरून स्थगिती दिली व उठविली याचे नेमके उत्तर राज्य शासनाकडे नाही. त्यामुळे कोणीही, कितीही नुकसानीचा कांगावा केला तरी कोल्हापूरकरांना विचार करण्याची गरज नाही. मूल्यांकनाचा अहवाल कोल्हापूरच्या बाजूने असल्यानेच तो लपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी) गांधी जयंतीदिवशी टोलनाक्यांवर ‘गांधीगिरी’टोलविरोधी कृती समितीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत. कृती समितीच्या व्यासपीठाचा राजकीय वापर न करता निवडणूक काळातही टोल आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आज, बुधवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या मेळाव्यात घेण्यात आला. २ आॅक्टोबरला गांधीजयंती दिवशी फुलेवाडी, शिये, शिरोली व शाहू या टोलनाक्यांवर सकाळी १० ते दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्याची घोषणा ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी यावेळी केली. मेळाव्यात कृती समितीची निवडणूक काळातील आंदोलनाची दिशा ठरल्याने प्रचाराच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे.राजारामपुरीतील अप्पाज कॉम्प्लेक्स येथे सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा निवडणूक काळात आंदोलन सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मेळावा झाला. यावेळी वरीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला.पानसरे म्हणाले, येत्या सोमवारी (दि. २९) टोलबाबतचा सर्वाेच्च न्यायालयात काहीही निकाल लागो. कोल्हापूरकर टोल देणार नाहीत.