कोल्हापूर : गोरगरीब, अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेल्या पुईखडी येथील अवनि संस्थेतील पंधरा मुलींना तसेच दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली. या प्रकारामुळे अवनितील सर्वच मुलींना धक्का बसला असून, संस्थेचे पदाधिकारीही गडबडून गेले आहेत. या सर्व मुलींची प्रकृती उत्तम असून, त्यांना तातडीने शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले.अवनिची एक शाळा व वसतिगृह पुईखडी येथे आहे. या ठिकाणी सध्या २५ मुली राहत आहेत. त्यातील दोघींना सोमवारी सकाळी अचानक ताप आला. संस्थेच्या प्रमुख प्रा. अनुराधा भोसले यांनी क्षणाचाही विलंब न करता याची माहिती जिल्हास्तरीय बाल कल्याण समितीला कळविली. समितीच्या सदस्या मुजावर यांनी तातडीने महानगरपालिकेचे एक पथक पाठवून त्यांच्या सहकार्याने या दोन मुलींची रॅपिड अँटिजन चाचणी केली, तर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.सर्व मुली एकत्र राहत, खेळत असतात. त्यामुळे नंतर सर्वच्या सर्व २५ मुलींची तसेच तेथे काम करणाऱ्या दोन स्वयंपाकी महिला यांचीही अँटिजन चाचणी करण्यात आली. दुर्दैवाने त्यात आणखी १३ मुली तसेच दोन स्वयंपाकी महिला यांच्या चाचणीचे अहवालही पॉझिटिव्ह आले. त्यामुळे अवनि संस्थेला धक्का बसला. महापालिका पथकाने या सर्व मुलींना शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्याचा निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली. या सर्वांना केएमटी बसमधून कोविड सेंटरला देण्यात आले. कोरोनाबाधित आढळलेल्या मुली या सहा ते अठरा वर्षे वयोगटातील आहेत.
CoronaVirus Kolhapur : अवनि संस्थेतील १५ मुलींसह १७ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 7:27 PM
CoronaVirus Kolhapur : गोरगरीब, अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेतलेल्या पुईखडी येथील अवनि संस्थेतील पंधरा मुलींना तसेच दोघा कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कोरोनाचा संसर्ग झाल्याची गंभीर बाब सोमवारी समोर आली. या प्रकारामुळे अवनितील सर्वच मुलींना धक्का बसला असून, संस्थेचे पदाधिकारीही गडबडून गेले आहेत. या सर्व मुलींची प्रकृती उत्तम असून, त्यांना तातडीने शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देअवनि संस्थेतील १५ मुलींसह १७ कोरोनाबाधितशिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल