कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ६५.९५ दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ वा.च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून ८५० व सिंचन विमोचकातून १०५८ असा एकूण १९०८ क्युसेक विसर्ग तर कोयना धरणातून २१६७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे. कासारी नदीवरील- यवलूज. वारणा नदीवरील -माणगाव व चिंचोली. दुधगंगा नदीवरील-सिध्दनेर्ली व दत्तवाड. वेदगंगा नदीवरील वाघापूर असे एकूण १७ बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात ३४.३७ टीएमसी तर अल्लमट्टी धरणात ४४.८९४ इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा
तुळशी ४४.२० दलघमी, वारणा ३७९.४९ दलघमी, दूधगंगा २६०.८६ दलघमी, कासारी ३०.१६ दलघमी, कडवी ३०.३५ दलघमी, कुंभी ३२.३९ दलघमी, पाटगाव ३४.८८ दलघमी, चिकोत्रा १६.३९ दलघमी, चित्री १३.३८ दलघमी, जंगमहट्टी ८.०५ दलघमी, घटप्रभा ३९.८४ दलघमी, जांबरे ८.०८ दलघमी, कोदे (ल पा) ४.२७ दलघमी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी
राजाराम २३.११ फूट, सुर्वे २३ फूट, रुई ५३ फूट, इचलकरंजी ५०.६ फूट, तेरवाड ४७.६ फूट, शिरोळ ३७ फूट, नृसिंहवाडी ३५ फूट, राजापूर २४.९ फूट तर नजीकच्या सांगली १०.३ फूट व अंकली १४.५ फूट अशी आहे.