कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचण्या वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याने गेल्या २४ तासांत तब्बल ३३ हजार ६५४ नागरिकांच्या विविध प्रकारे चाचण्या करण्यात आल्या. यापैकी केवळ १७२५ जण पॉझिटिव्ह आले असून हा पॉझिटिव्हिटी दर ५.१२ टक्के इतका होत आहे. हा दर कालच्या तुलनेत एक टक्क्यांनी वाढला आहे. याच पध्दतीने चाचण्या होत राहिल्यास काही दिवसात संख्या वाढून नंतर ती कमी होण्यास सुरूवात होईल असे प्रशासनाचे मत आहे.
चाचण्या वाढवल्याने रुग्ण वाढले असले तरी वाढलेली संख्या पाहून मात्र कोल्हापूरकरांच्या छातीत धस्स झाले. रुग्णसंख्येत चढउतार होत असल्याने जिल्हा प्रशासन व्यवहारावरील निर्बंध कितपत शिथिल करते हा प्रश्र्नच आहे. व्यापारी संघटना मात्र व्यवहार सुरू करण्यावर ठाम आहेत. कोल्हापूर शहरात ४०६, करवीर तालुक्यात ३८१ आणि हातकणंगले तालुक्यात २२१ नागरिक पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात ३५ मृत्यू झाले असून त्यातील सर्वाधिक आठ कोल्हापूर शहरातील आहेत. करवीर आणि हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
कोल्हापूर ०८
मंगळवार पेठ २, सुभाषनगर, राजारामपुरी, उत्तरेश्वर पेठ, शहर, शुक्रवार पेठ, रामानंदनगर
करवीर ०६
दऱ्याचे वडगाव, शिंगणापूर, पाडळी खुर्द, आंबेवाडी २, उचगाव
हातकणंगले ०६
माणगाव, नागाव, कुंभोज, हेरले, हातकणंगले, कोरोची
पन्हाळा ०३
वाघवे, कोडोली, माले
राधानगरी ०२
चंद्रे, राधानगरी
कागल ०२
कागल, व्हन्नूर
शिरोळ ०२
दत्तवाड, धरणगुत्ती
आजरा ०२
शाहूवाडी ०१
आकुर्डे
इचलकरंजी ०१
गडहिंग्लज ०१
शेंद्री
चंदगड ०१
कुर्तनवाड
इतर १
निपाणी