अमर मगदूम
राशिवडे : दाजीपूर (ता. राधानगरी) येथील अभयारण्या लगत असणाऱ्या ऋषिकेश विलास पाटील यांच्या ऋषिकेश होम स्टे आणि रिसॉर्ट मध्ये जुगार खेळत असताना राधानगरी पोलिसांनी छापा टाकून ११ लाख ७ हजार सातशे ऐशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रोख रक्कमेसह चार चारचाकी गाड्या मोबाईल यांचा समावेश आहे.ओलवण दाजीपूर (ता. राधानगरी) येथील ऋषिकेश होम स्टे आणि रिसॉर्ट मध्ये जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरुन राधानगरी पोलिसांनी छापा टाकून रिसॉर्ट मालक ऋषीकेश पाटील सह अठरा जणांना ताब्यात घेतले.महेश जोशी (मालवण), महेश गांधी (कणकवली), शरद गुरव (खारेपाटण), दत्ता वाघमारे (कणकवली), किशोर सावंत (फोंडा घाट), अनिल सिलकर (कणकवली), संदीप राणे, जयवंत बाईत, निलेश हेरेकर (सिंधुदुर्ग), रामचंद्र धुरसोळे, सुधीर गांधी (खारेपाटण), दिनेश जैतापकर (राजापूर), अलपेश गांधी, प्रकाश साळवी (फोंडा), विशाल मोहिते (मालवण), विनायक शिर्के, मिलिंद कुबडे (फोंडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नजीर खान, के. डी. लोकरे, रोहीत खाडे, सचिन पारखे यांनी ही कारवाई केली.