कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने ३१ जुलैपर्यंत घरफाळा भरल्यास सहा टक्के सवलत देण्याची योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत महापालिकेच्या तिजोरीत दि. १ एप्रिल ते २८ जुलै अखेर १९ कोटी ६४ लाख १८ हजार ७११ रुपयांचा घरफाळा जमा झाला.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे व आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मर्यादित राहिल्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाचा घरफाळा भरण्यासाठी ३१ जुलैपर्यंत सहा टक्के सवलत योजना लागू केली होती. या सवलत योजनेचे शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे शनिवारी सुट्टी दिवशीही सुरू ठेवली आहेत.
- अशी झाली जमा -
-गांधी मैदान नागरी सुविधा केंद्र - २,३१,००, ९८०
- शिवाजी मार्केट नागरी सुविधा केंद्र - १, ८७,७१,५१०
- राजारामपुरी नागरी सुविधा केंद्र - ३, १३,७३,७५५
- ताराराणी मार्केट नागरी सुविधा केंद्र- ४,१७,७०,९३९
- महापालिका इमारत नागरी सुविधा केंद्र - २,२०,३७,१३३
- कसबा बावडा नागरी सुविधा केंद्र - ३२,१९,६५०
- ऑनलाईन जमा -४,६१,४४,७४४
- एकूण जमा - १९,६४,१८,७११