प्रयाग चिखली : करवीर तालुक्यातील वरणगे व पाडळी या गावांमध्ये आरोग्य केंद्रामार्फत रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात आली. वरणगेत १८९ जणांची चाचणी करण्यात आली, त्यात सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पाडळी बुद्रुक येथे ११५ जणांची चाचणी करण्यात आली, त्यात १३ जण पॉझिटिव्ह आढळले. या चाचणीसाठी वरणगे आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी सचिन भोसले, डॉ. नीलम कामत, आरोग्यसेविका मीना वंजारे तर पाडळी बुद्रुक येथे आरोग्यसेविका अनघा पाटील, आरोग्यसेवक मोहन जांभळे, मदतनीस सुभद्रा पवार यांनी परिश्रम घेतले. गुरुवारपासून जास्तीत जास्त ग्रामस्थांची रॅपिड अँटिजन चाचणी करण्यात येणार असल्याचे सचिन भोसले व अनघा पाटील यांनी सांगितले.
चौकट : प्रयाग चिखलीत घरोघरी करणार अँटिजन चाचणी
वडणगे : प्रयाग चिखली येथे संभाव्य महापुराचा धोका आणि संभाव्य स्थलांतराच्या पार्श्वभूमीवर घरोघरी अँटिजन चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळ दूध संघाचे संचालक एस. आर. पाटील यांनी दिली. आत्तापर्यंत प्रयाग चिखली येथे पाचशेहून जास्त लोकांची अँटिजन चाचणी केली असून, त्यात पाचजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यावेळी उपसरपंच राहुल कांबळे, तलाठी श्रीकांत नाईक, ग्रामसेवक बी. व्ही. इंगवले, सदाशिव बोराटे, अरुण मांगलेकर, सनी आंबले, भूषण पाटील, विजय कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी पन्हाळकर, आर. पी. व्हटकर, एस. एम. पाटील यांनी परिश्रम घेतले.
फोटो : २३ प्रयाग चिखली चाचणी
ओळी - प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामपंचायतीतर्फे घरोघरी अँटिजन चाचणी करण्याचा प्रारंभ गोकुळ दूध संघाचे संचालक एस. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.