शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

पोलिस पडताळणीअभावी पासपोर्टचे १९०० अर्ज प्रलंबित

By admin | Published: July 04, 2017 6:44 PM

७२ तासांत कार्यवाही करण्याचे पोलीस ठाण्यांना आदेश : संजय मोहिते

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0४ : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. सध्या पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट कार्यालयात सुमारे १९०० अर्ज प्रलंबित आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ७२ तासात पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून ते पुढील कार्यवाहीसाठी पासपोर्ट केंद्राला पाठवून देण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना मंगळवारी दिल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी पत्रकारांना दिली. नागरिकांच्या सोयीसाठी चार महिन्यांपूर्वी कसबा बावडा येथील पोस्टाच्या मुख्य कार्यालयात पासपोर्ट केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात दरदिवशी २०० अर्ज दाखल होतात. या ठिकाणी पासपोर्ट अर्ज स्वीकारणे आणि देण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड येथील लोकांचा वेळ आणि पैशांची बचत होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून अर्जांची पडताळणी वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी पासपोर्ट केंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. पोलीस अधीक्षक मोहिते यांनी या तक्रारींची दखल घेत मंगळवारी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना ७२ तासांच्या आत अर्जांची पडताळणी करून ते पासपोर्ट केंद्राला पाठविण्याचे आदेश दिले.

अशी होते प्रक्रिया

पासपोर्ट काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करून तो अर्ज पोलीस मुख्यालयातील पासपोर्ट विभागात सादर केला जातो. तेथून तो पोलीस पडताळणीसाठी संबंधित पोलीस ठाण्यात पाठविला जातो. येथील गोपनीय विभागाकडून संबंधित व्यक्तीवर कोणत्याही प्रकारे गुन्हे दाखल नसल्याची खात्री केली जाते. त्यानंतर पोलीस निरीक्षकांच्या समोर ओळखपरेड करून सही घेऊन तो अर्ज टपालाने पुन्हा पासपोर्ट विभागाला पाठविला जातो. त्यानंतर तो येथील निरीक्षकांच्या सहीने कसबा बावडा येथील टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राला पाठविला जातो. याठिकाणी उमेदवाराची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर त्यांना जावक क्रमांक देऊन तो अर्ज पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे पाठविला जातो. तेथून अर्जाला अंतिम मंजुरी मिळताच संबंधित व्यक्तीचा पासपोर्ट टपाल कार्यालयातील पासपोर्ट केंद्राकडे पाठविला जातो.

कार्यालयीन घोळ

संबंधित व्यक्तीचा अर्ज पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला गोपनीय विभागाकडून निरोप दिला जातो. काहीवेळा कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिभार असल्याने अर्ज पुढे जाण्यासाठी रेंगाळतात, तर काहीवेळा संबंधित व्यक्ती पाठपुरावा करीत नसल्याने अर्जांकडे कोणी लक्ष देत नाही. या घोळामध्ये पासपोर्ट अर्जांच्या पडताळणीला विलंब होतो.

२०० रुपये आकारणी

पासपोर्टची पोलीस पडताळणी मोफत केली जाते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारावे असा नियम नाही. तरीही पोलीस प्रत्येक अर्जामागे २०० रुपये घेतातच, अशी चर्चा नागरिकांत आहे