समीर देशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पूर आल्यानंतर पूर्णपणे संपर्क तुटणाऱ्या गावांना जोडण्यासाठी २५०० कोटी रुपये खर्चून १२ उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे. कोल्हापूर शहर, राष्ट्रीय महामार्ग, पन्हाळा रस्ता, सांगलीजवळ आणि शिरोळ तालुक्यात हे पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसमोर या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले आहे.गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामध्ये सध्याच्या रस्त्यांच्या किती मर्यादा आहेत, हे स्पष्ट झाले आहे. ६५ टक्के पाऊस पाच दिवसांत पडल्याने करवीर, शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत आणि कोल्हापूर शहरात अभूतपूर्व अशी पूरस्थिती निर्माण झाली. कल्पना न केलेल्या ठिकाणीही पाणी आल्याने अनेक रस्ते बंद झाले. परिणामी प्रशासनाला या गावातील ग्रामस्थांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागली. पन्हाळा किल्ल्याचा रस्ता खचल्याने १५ दिवस हा मार्ग बंद होता. सांगली फाट्याजवळचा राष्ट्रीय महामार्गही पाण्याखाली गेल्याने कोल्हापूर शहरामध्ये तर पेट्रोल, डिझेल टंचाई निर्माण झाली.या सर्व प्रश्नांवर उत्तर म्हणून या १२ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी जागतिक बॅँकेच्या प्रतिनिधींसमोर सादरीकरण केले आहे. किती निधी उपलब्ध होईल, यावर प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून आहे.असे आहेत प्रस्तावित उड्डाणपूलअन. पुलाचा मार्ग कि. मी. अपेक्षित खर्च१ खिद्रापूर ते कुरुंदवाड ३० १००० कोटीसैनिक टाकळी, अकिवाट,मजरेवाडी असा हा उड्डाणपूल असेल.२ दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक १.३ ७० कोटी३ टाउन हॉल ते खानविलकर पंप १ १२५ कोटी४ गंगावेश ते शिवाजी पूल १.६ ८० कोटी५ बुधवार पेठ ते पन्हाळा १ ५० कोटी६ कसबा बावडा ते शिये ६ २०० कोटी७ तावडे हॉटेल ते सांगली फाटा २.५० २५० कोटी८ सांगली फाटा ते अंकली, शिरोळ ६ २५० कोटी९ शिवाजी पूल ते केर्ली १0 ४०० कोटी१० कोल्हापूर-गगनबावडा रस्ता उंच करणे ३० १२५ कोटी११ निलेवाडी, चिकुर्डे १ २४ कोटी१२ टेकवाडी ३५० मीटर १५ कोटी
पूरग्रस्त गावांसाठी २५०० कोटींचे उड्डाणपूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:25 AM