सरवडे : राधानगरी तालुक्यातील कासारवाडा पैकी बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात आजाराने २० शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर १० हून अधिक शेळ्या गंभीर आहेत. या घटनेची माहिती मिळताच पशूवैद्यकीय डॉक्टरांचे पथक दाखल झाले. पशूवैद्यकीय डॉक्टरांनी गंभीर असणाऱ्या शेळ्यांना औषध उपचार केल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.धनगर समाजाचा शेळ्या पाळणे हा अनेक वर्षाचा व्यवसाय आहे. बोक्याचा धनगरवाडा येथे काही दिवसापासून शेळ्या आजारी पडू लागल्या. यात २० शेळ्यांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती काहींनी बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे व यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे यांना दिली. मोरे व वाघमोडे यांनी ही माहिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिली.यानंतर कोल्हापूरहून पशुसंवर्धने जिल्हा सहाय्यक आयुक्त आर.एम. वडगावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक धनगरवाड्यावर दाखल झाले. डॉक्टरांनी सर्व शेळ्यांची तपासणी करून औषधोपचार केले. तसेच गंभीर असलेल्या शेळ्यांचे रक्त तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.
राधानगरी तालुक्यातील बोक्याचा धनगरवाडा येथे अज्ञात रोगाने २० शेळ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 2:18 PM