आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : बनावट आधारकार्डाच्या आधारे खरेदी करारपत्र तयार करून त्या आधारे जमीन विक्री प्रकरणात २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित कुमार श्यामलाल पंजाबी (रा. राजारामपुरी ११ वी गल्ली, कोल्हापूर) याच्यासह अज्ञात साथीदार (नाव व पत्ता समजून येत नाही) विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद स्नेहल अभिजित चित्रगार (वय ३०, रा. ११८२ / १९६ प्लॉट नंबर ०२ माळी कॉलनी टाकाळा, कोल्हापूर) यांनी दिली. यापूर्वी कुमार पंजाबीवर अशाच प्रकारचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, कसबा बावडा येथील रजिस्टर आॅफिस क्रमांक दोन येथे १४ सप्टेंबर २०१६ ला संशयित कुमार पंजाबी व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून छाया ओमप्रकाश चव्हाण (रा. पुणे) यांच्या कोल्हापुरातील इंगळेनगर येथील मिळकत क्रमांक ५३० / १/ १३ पैकी प्लॉट नंबर १ क्षेत्र २.९७ चौरस मीटरचा प्लॉट छाया चव्हाण नावाची बनावट महिला तयार केली. त्यानंतर तिच्या नावे बनावट आधारकार्ड तयार करून त्या आधारे कुमार पंजाबीने खरेदी करारपत्र तयार केले. या खरेदी करारपत्राच्या आधारे सरकारी दप्तरी नोंदी लावल्या. या नोंदी लावून डायरी उतारा व ७/ १२ पत्रक मिळवले. ही कागदपत्रे पंजाबीने इस्टेट ब्रोकर एजंट सुधीर पांडुरंग माने व सूरज मधुकर पावले (दोघे राहणार कोल्हापूर) यांच्यामार्फत वासंती शेट्टी व सुजाता चौगुले (दोघी राहणार कोल्हापूर) यांना दाखविले.संशयिताने धंद्यामध्ये पैशांची आवश्यकता आहे, असा बहाणा सांगून प्लॉट विक्री करण्याचे त्यांना असे सांगितले. त्यानुसार स्नेहल चित्रगार यांच्यासह वासंती शेट्टी व सुजाता चौगुले यांचा विश्वासघात करून सुमारे त्यांची २० लाख रुपयांची फसवणूक केली.
कुमार पंजाबीसह साथीदारांवर २० लाखांचा फसवणुकीचा गुन्हा
By admin | Published: April 20, 2017 6:18 PM