कोल्हापूर : जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा ‘राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार’ यंदा चार जिल्हा परिषद आणि एक पंचायत समिती सदस्य, तसेच १५ कर्मचाऱ्यांना बुधवारी जाहीर करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार यांनी पुरस्कारासाठी निवड झालेल्यांची नावे जाहीर केली. सहकार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान या निकषांवर पाच सदस्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. दहा वर्षे सेवा पूर्ण, गोपनीय अहवालातील अतिउत्कृष्ट, उत्कृष्ट शेरे, नियमांचे ज्ञान, समयसूचकता, निर्णयशक्ती, सहकार्याची भावना, सामाजिक व शैक्षणिक कलागुण, सचोटी, प्रामाणिकपणा या निकषांवर १५ कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. पुरस्कार विजेते व कंसात मतदारसंघ - सदस्य : जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा पाटील (शित्तूर वारूण, ता. शाहूवाडी), मेघाराणी जाधव (तिसंगी, ता. गगनबावडा), भाग्यश्री पाटील (कोडोली, ता. पन्हाळा), विकास कांबळे (शिरोळ), पंचायत समिती सदस्या अनिता माने (शिरोळ). कर्मचारी - अविनाश कांबळे (सांख्यिकी विस्तार अधिकारी, सामान्य प्रशासन), मदन जाधव (वरिष्ठ सहायक, सामान्य प्रशासन, कोल्हापूर), नबिरून मुल्ला (कनिष्ठ सहायक, प्राथमिक आरोग्य केंद्र, टाकळी, ता. शिरोळ), इक्बाल तांबोळी (वाहनचालक, करवीर पंचायत समिती), भीमराव शिणगारे (परिचर, पशुचिकित्सा केंद्र, पडळ, ता. पन्हाळा), सुनंदा कोष्टी (पर्यवेक्षिका, एकात्मिक बालविकास सेवा योजना, कागल), शिवाजी कोळी (सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, हातकणंगले), सुरेश पाटील (कृषी अधिकारी, कागल), अंकुश तेलंगे (आरोग्यसेवक, तालुका आरोग्य विभाग, पन्हाळा), सुनीता देसाई (आरोग्यसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, कडगाव, ता. भुदरगड), नासीर नाईक (आरोग्य सहायक, कागल), विजया पाटील (आरोग्य सहायिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोतोली, ता. पन्हाळा), अशोक म्हातुगडे (औषध निर्माण अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उत्तूर, ता. आजरा), सुरेश भांदुगरे (शाखा अभियंता, बांधकाम विभाग), दाऊतहुसेन मुल्लाणी (पशुधन पर्यवेक्षक, पंचायत समिती, आजरा). अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, चंद्रकांत वाघमारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील २० जणांना ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार
By admin | Published: June 25, 2015 1:13 AM