शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

गोकुळ शिरगावमध्ये २० टन ‘मॅगी’ जप्त

By admin | Published: June 05, 2015 1:05 AM

३२ लाख रुपये किंमत : ‘अन्न व औषध’ची कारवाई

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथून मॅगीचा ३२ लाख रुपये किमतीचा २० टन ३५ किलो सीलबंद साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने बुधवारी रात्री उशिरा जप्त केला.या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘गोकुळ शिरगाव येथील परदेशी अ‍ॅँड सन्स हे ‘टू मिनिट मॅगी नूडल्स’चे कोल्हापूर जिल्ह्याचे वितरक आहेत. मॅगी नूडल्सचे विविध प्रकारचे एकूण १६ नमुने तपासणीसाठी घेऊन सुरक्षिततेचा उपाय म्हणून परदेशी यांचा मॅगीचा सर्व साठा जप्त केला. जिल्ह्यामध्ये वितरकांनी विक्री केलेल्या विविध विक्रेत्यांकडील मॅगीचा साठा परत घेण्याच्या सूचना केल्या आहेत, जेणेकरून अहवाल येईपर्यंत पूर्ण जिल्ह्यातील मॅगीची विक्री बंद राहील. परदेशी अ‍ॅँड सन्स यांनी मॅगीचा पुरवठा पूर्णपणे थांबवावा, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षानुसार विक्रेते, पुरवठादार व उत्पादक यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) संपत देशमुख, सुकुमार चौगुले, अन्न सुरक्षा अधिकारी संतोष सावंत, महेंद्र पाटील, अभिनंदन रणदिवे, बिभीषण मुळे, नमुना सहायक सतीश माने, आदींनी केली. देशभर मॅगी जप्तीची कारवाई होत असताना कोल्हापुरात काहीच हालचाली होत नव्हत्या. त्याबद्दल माध्यमांतून टीका झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाला जाग आली व त्यानंतर उशिरा का असेना, या विभागाने ही कारवाई केली आहे. (प्रतिनिधी)