शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
4
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
5
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
6
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
8
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
10
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
11
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
12
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
14
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
15
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
16
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
18
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
19
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
20
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?

जलयुक्त शिवारासाठी झटताहेत २० गावे

By admin | Published: January 29, 2015 11:47 PM

कागल तालुका : जलसमृद्धीकडे वाटचाल; नाला बंधारे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढणे सुरू

दत्तात्रय पाटील -म्हाकवे -कमी-अधिक प्रमाण, बदललेले कालमान यामुळे भविष्यात पाणीटंचाईस सामोरे जावे लागू नये या हेतूने शासनाने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून बृहत् आराखडा आखला आहे. या अभियानाला कागल तालुक्यातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २० हून अधिक गावांमध्ये लोकसहभागातून सिमेंट नाला बंधारे बांधणे, मातीसह सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.काळम्मावाडी धरणासह चिकोत्रा, सर्फनाला, पारगाव, आदी धरणांच्या माध्यमातून दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा नदींसह उजव्या कालव्यातून बारमाई पाणी वाहत आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांशी शेती-शिवार हिरवाईने नटला आहे. मात्र, अद्यापही शेकडो हेक्टर जमीन पाण्याअभावी पडीक राहिली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातून पाणीसाठा (वॉटर बॅँक) वाढविण्याच्या दृष्टीने ग्रामस्थ सरसावले आहेत.नंद्याळ (ता. कागल) येथे कृषी विभागामार्फत सिमेंट नाला बंधारे मंजूर झालेल्या कामाला सुरुवात झाली आहे, तर सोनाळी, चौंडाळ, जैन्याळ, माद्याळ, केनवडे, क।। सांगाव, दौलतवाडी, सावर्डे खुर्द येथील सिमेंट नाल्यातील गाळ काढण्याची कामे सुरू आहेत, तर करड्याळ येथील माती नाल्यामध्ये साचलेला गाळ काढण्याचे काम ग्रामस्थांनी हाती घेतले आहे.या कामासाठी लोकवर्गणीतून जेसीबी मशीन आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये मातीवजा गाळ टाकायचा आहे, त्यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे.त्याचबरोबर गलगले, बामणी, म्हाकवे, मेतगे, वंदूर, यमगे, आदी गावांमध्ये वनराई बंधाऱ्याची कामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे तालुक्यात जलसमृद्धीमध्ये भर पडणार आहे.‘शासनाने केलेल्या आवाहनांना प्रतिसाद देत तालुक्यातील गावांनी समृद्धी पर्वालाच सुरुवात केली आहे. बंधाऱ्यातील अनेक वर्षांपासून साचलेला गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर या बंधाऱ्यातील पाणीसाठा दुपट्टीने वाढणार आहे. तसेच बंधाऱ्याच्या खालील भागातील विहिरींची पाणीपातळीही वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे अभियान शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे.-दीपक चव्हाण, गटविकास अधिकारी, कागल.