शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

२०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक राहणार के. पी. पाटील : साखरेचे दर पडण्याची भीती; मुरगूड येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 12:41 AM

साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे.

ठळक मुद्देबिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील पाटील यांना ‘जीवन गौरव पुरस्कार

मुरगूड : साखर कारखानदारीत सध्या वाईट दिवस आले आहेत. भारतासह जागतिक पातळीवर साखरेचे दर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गत ऊस हंगामात १०० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक आहे. भविष्यात भारतात ३५० लाख मेट्रिक टन साखर निर्माण होईल; पण देशाची गरज २५० लाख मेट्रिक टनांची असल्याने यातील १०० अशी एकूण २०० लाख टन साखर शिल्लक राहणार असल्याने साखर उद्योग अडचणीत सापडण्याची शक्यता बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केली.

साखर कारखानदारीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भारतीय ऊस संशोधन केंद्रामार्फत के. पी. पाटील यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ मिळाला आहे. यानिमित्ताने मुरगूड (ता. कागल) येथे विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी चांदीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन के. पी. पाटील यांचा सत्कार केला.

यावेळी के. पी. पाटील म्हणाले, बिद्री कारखान्याची सत्ता हातात घेतली त्यावेळी अनंत अडचणी होत्या; पण सभासद, संचालक आणि कर्मचारी यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे आम्ही तरलो. यामध्ये प्रवीणसिंह पाटील यांनी हिमालयाएवढी मदत केली आहे.सुधीर सावर्डेकर यांनी स्वागत केले. संजय मोरबाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी आनंदराव कल्याणकर, शिवाजी पाटील, साताप्पा पाटील, कुरणीचे माजी सरपंच आंनदा पाटील, अर्जुन मसवेकर, अनंत घाटगे, वसंतराव शिंदे, रघुनाथ बोग्राडे, नामदेवभांदिगरे, राजू चव्हाण, राजू आमते, अमर देवळे, दिग्विजय चव्हाण, अमोल मंडलिक, आदी प्रमुख उपस्थितहोते. वसंतराव शिंदे यांनी आभार मानले.‘बिद्री’वर जागा देणारबिद्री साखर कारखाना असू दे किंवा आपले वैयक्तिक जीवन असू दे. अडचणीच्या वेळी विश्वनाथराव पाटील मुरगूड बँकेने आपल्याला मदत केली आहे. या बँकेची बिद्री कारखाना कार्यस्थळावर जागा मिळावी, अशी मागणी आहे. आपण ती मागणी संचालक मंडळाबरोबर चर्चा करून पूर्ण करणार आहे, असे अभिवचन अध्यक्ष के. पी. पाटील यांनी यावेळी दिले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर