शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

दररोज २१ एमएलडी सांडपाणी कोल्हापुरात विनाप्रक्रिया पंचगंगेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 6:00 AM

जलचरांना मोठा फटका : शहर व परिसरातील नागरिकांसोबत शेतीचेही आरोग्य बिघडले, देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश

नसीम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : न्यायालयाने सातत्याने फटकारल्यानंतरही कोल्हापूर शहरातील २१ एमएलडी सांडपाणी दररोज विनाप्रक्रिया थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्याचा फटका माणसांसोबतच शेती आणि जलचरांना बसत आहे.देशातील १० प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगेचा समावेश होतो. या प्रदूषणात कोल्हापूर शहराचा वाटा सर्वाधिक आहे. या प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पन्नासवर नोटिसा काढल्या आहेत. तरीही दुर्लक्ष केल्याने अखेर उच्च न्यायालयानेच कान टोचले. तेव्हा कुठे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभा राहिला. शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी या तीन पम्पिंग स्टेशनमधून प्रतिदिन १३० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. शहरातील १२ नाल्यांतून आलेल्या ९५ एमएलडी सांडपाण्यावर दुधाळी, बापटकॅम्प, लाईन बाजार येथील केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पासाठी ७८ कोटींचा खर्च झाला आहे; पण अजूनही ते पूर्ण क्षमतेने चालवले जात नाही. त्यामुळे २१ एमएलडी पाणी थेट नदीत मिसळते. यामुळे माणसांसोबतच जलचर आणि जैवविविधतेलाही फटका बसत आहे. हिरवा तवंग आणि जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन जलचर गुदमरून मरण पावतात. या खोऱ्यातील मासेमारी आता संपल्यातच जमा आहे.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमलेल्या निरी समितीने अहवाल दिल्यानंतर जिल्ह्यातील सहा औद्योगिक वसाहतींतील २२८० उद्योेगांवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याचे निर्बंध घालण्यात आले. यामुळे त्यांचे सांडपाणी नदीत मिसळणे काही प्रमाणात बंद झाले आहे. तरी इतर ठिकाणांवरून येणारे सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. शहराबरोबरच नदीकाठावरील १७४ गावांना प्रदूषणाची मोठ्या प्रमाणावर झळ बसत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने शासनाकडे १०८ कोटी रुपयांची मागणी केली होती; पण त्यालाही पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर ९६ कोटींचा सुधारित प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी दिला. त्यालाही शासनाकडून प्रतिसाद मिळालेला नाही.नदीशेजारी असूनहीटँकरने पाणीकोल्हापूर शहरातून बाहेर पडणारे सांडपाणी पंचगंगेतून वाहत जाऊन नृसिंहवाडीला कृष्णा नदीला जाऊन मिसळते. कोल्हापूर ते नृसिंहवाडी या जवळपास ६० मीटरच्या पट्ट्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचे अक्राळविक्राळ स्वरूप धारण करते. शहराने केलेल्या घाणीचा फटका या नदीकाठावरील जनतेला आणि शेतीलाही बसतो. नदीकाठावर राहूनदेखील तब्बल ३९ गावांतील लोकांना पिण्यासाठीच्या पाण्याची व्यवस्था टँकरद्वारे अथवा आरओ प्लान्टद्वारे करावी लागते.शेती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरपंचगंगा खोºयातील करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या तीन तालुक्यांतील शेतीला या प्रदूषणाची मोठी झळ बसत आहे. फेसाळलेल्या पाण्यामुळे या भागातील बहुतांश शेती क्षारपड होऊ लागली आहे. या भागात ऊस या प्रमुख पिकासह धान्य, कडधान्य आणि भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मध्यंतरी शिरोळमध्ये पिकणाºया भाज्या खाल्ल्या तर कॅन्सर होतो, अशा अफवा होत्या. शिवाय दरवर्षी अतिसाराची साथ ठरलेलीच असते.

टॅग्स :pollutionप्रदूषण