या अर्जांच्या छाननीसह निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया आज, गुरुवारपासून सुरू होणार आहे. दुसऱ्या फेरीअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार (दि. १४) पासून सुरू झाली. त्यानंतर बुधवारअखेर प्रवेशासाठी विज्ञान शाखेसाठी ५१७, वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी २०५, वाणिज्य मराठी माध्यमासाठी १३६, तर कला मराठी माध्यमासाठी ३८ आणि कला इंग्रजी माध्यमासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. दुसऱ्या फेरीतील प्रवेश क्षमता ८८५४ असून प्रवेशासाठी शिल्लक विद्यार्थी ६८५६ आहेत. त्यामुळे २१८९ जागा रिक्त राहणार आहेत. दुसऱ्या फेरीत दाखल झालेल्या अर्जांच्या छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर सोमवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि शहरातील ३४ कनिष्ठ महाविद्यालयांच्या सूचनाफलकावर निवड यादी प्रसिद्ध होईल. निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांनी त्या दिवसापासून बुधवार (दि. २३) पर्यंत महाविद्यालयातील प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावयाची आहे.
चौकट
बदल केलेल्यांचे प्रमाण अधिक
या दुसऱ्या फेरीत नव्याने अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अर्जामध्ये आरक्षण, विद्याशाखा, माध्यम, पसंतीक्रम आणि पडताळणीनंतर गुणांमध्ये बदल केलेल्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
एकूण प्रवेश क्षमता : १४६८०
दाखल झालेले एकूण अर्ज : १२९६१
पहिल्या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी : ९५८८
या फेरीत प्रत्यक्षात प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी : ५८३५
प्रवेशासाठी शिल्लक असलेले विद्यार्थी : ६८५६
दुसऱ्या फेरीतील प्रवेश क्षमता : ८८४५