कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी १५१ अर्ज दाखल झाले. त्यामुळे दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या तब्बल २१९ च्या घरात गेली आहे. सोमवारी अर्ज दाखल झालेल्यांमध्ये प्रामुख्याने आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील गटाच्या उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, कसबा बावडा गट क्र. ५ मधून तब्बल २८ असे विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. आज, मंगळवारी अर्जांची छाननी आहे.करवीर, हातकणंगले, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, कागल अशा सात तालुक्यांतील १२२ गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरावयाच्या पहिल्याच दिवशी ३९, दुसऱ्या दिवशी २९, तर सोमवारी अखेरच्या दिवशी १५१ अर्ज दाखल झाले.दरम्यान, गट क्र. ५ कसबा बावडामधून दोन उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. मात्र, या गटातून तब्बल २८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे या गटातून दोन्ही पॅनेलमध्ये कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता आहे. दोन्हीही गटांकडून शांततेत अर्ज दाखल झाले. सोमवारी अर्ज दाखल केलेल्यांमध्ये प्रामुख्याने संस्था गटातून आमदार महादेवराव महाडिक, गट क्र. ४ मधून अमल महाडिक, गट क्र. २ मधून सर्जेराव माने, गट क्र. ४ मधून शशिकांत खवरे, गट क्र. ५ मधून विश्वास नेजदार, महिला गटातून कल्पना किडगावकर, गट क्र. ३ मधून बाजीराव पाटील, मालिनी पाटील, अजित पाटील, गट क्र. ६ मधून लहू पाटील, कुंडलिक चरापले यांचा समावेश आहे.कसबा बावड्यातून विश्वास नेजदार, जयवंत पाटील, श्रीहरी पाटील, तानाजी चव्हाण, विद्यानंद जामदार, शिवाजी चौगले, हरिष चौगले, दत्तात्रय उलपे, कमलाकर नेजदार यांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच यापूर्वी या गटातून दिलीप उलपे, काशिराम उलपे, बाळासोा पाटील, रवींद्र रेडेकर, विजय चव्हाण यांनीही अर्ज दाखल केले आहेत.दरम्यान, आज अर्जांची छाननी होणार आहे, तर बुधवारी (दि. २५) छाननीनंतरची यादी प्रसिद्ध होईल.प्रचाराला येणार गतीअर्ज दाखल झाल्यामुळे आता दोन्ही गटांकडून प्रचाराला गती येणार आहे. सात तालुक्यांतील १२२ गावे पिंजून काढण्याचा प्रयत्न दोन्ही गटांकडून होणार आहे. त्याचे नियोजन झाले असल्याने प्रचाराला गती येणार आहे.
‘राजाराम’साठी तब्बल २१९ अर्ज
By admin | Published: March 24, 2015 12:34 AM