कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या प्राथमिक मतदार यादीमध्ये २२ दुबार ठराव दाखल झालेले आहेत. या प्राथमिक दूध संस्थांना नोटिसा लागू केल्या असून दोन्ही गटांची सुनावणी घेऊन चुकीची कागदपत्रे दाखल करणाऱ्यांवर फौजदारी दाखल केली जाणार आहे. दुबार २२ ठरावामध्ये ६ ठराव कागल तालुक्यातील आहेत. दूध संघासाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी प्राथमिक दूध संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. ३२६३ पैकी ३२६२ ठराव दाखल झाले आहेत. यापैकी २२ ठराव दुबार झाले असून हे ठराव दाखल करणाऱ्या दोन्ही गटांना नोटिसा काढण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुनावणी होऊन कागदपत्रांची पडताळणी होऊन पात्र-अपात्र ठरविण्यात येणार आहे. चुकीची कागदपत्रे देऊन ठराव दाखल केलेल्या प्रतिनिधींवर फौजदारी दाखल केली जाणार आहेत, याबाबत थेट सहकार प्राधीकरण आयुक्तांनीच आदेश दिले आहेत. त्याचबरोबर आजपासून, दि. ११ प्रारूप यादीवर हरकती दाखल होणार आहेत. २० फेबु्रवारीपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत असून ७ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.
‘गोकुळ’साठी २२ दुबार ठराव दाखल
By admin | Published: February 11, 2015 12:12 AM