इचलकरंजी : येथील आयजीएम हॉस्पिटलला नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गोकुळचे नवनिर्वाचित संचालक नावीद मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी १०० मशीन देण्यात येणार आहेत.
मुश्रीफ म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढत असून ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. याला पर्याय म्हणून फौंडेशनच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप करण्यात आले. पुरवठा कमी असल्याने सध्या २५ मशीन दिल्या असून, आणखीन मशीन काही दिवसांत देण्यात येणार आहेत. सीपीआर, आयजीएम, जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरलाही मशीन देण्यात आली आहेत. तसेच मंत्री मुश्रीफ यांनी दिलेल्या आश्वासनानुसार येत्या काही दिवसांत एचआरसीटी व सिटी स्कॅन मशीन यांचीही आयजीएम हॉस्पिटलमध्ये पूर्तता करण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, अमित गाताडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकुमार शेट्ये, संजय बेडक्याळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी
२५०५२०२१-आयसीएच-०१
इचलकरंजीत आयजीएम हॉस्पिटलला नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्यावतीने २५ आॅक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले.