शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

सरकारी बाबूंची अडीच हजार पदे रिक्त

By admin | Published: March 14, 2016 12:29 AM

विभागीय आयुक्तांना अहवाल : सार्वजनिक बांधकामसह पाटबंधारेवर जादा भार

प्रवीण देसाई -- कोल्हापूर --जिल्ह्यातील ३६ शासकीय कार्यालयांमध्ये एकूण २६८५ पदे रिक्त असल्याचे चित्र पुढे आले आहे. १३ हजार ५६ मंजूर पदांपैकी १० हजार ३७१ लोकच कार्यरत आहेत. एस. टी. महामंडळासह सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे कार्यालय, विक्रीकर कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक या कार्यालयांमध्ये सर्वाधिक पदे रिक्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार २२५ जण हाकत आहेत. रिक्त पदांचा ताण कार्यरत कर्मचाऱ्यांवर पडत असल्याने उर्वरित पदे केव्हा भरली जाणार? अशी विचारणा होत आहे.राज्य शासनाकडून जिल्ह्यातील विविध कार्यालयांमधील पदांची माहिती मागविण्यात आली. त्यानुसार नुकताच जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे. वर्ग एक ते चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या मंजूर व कार्यरत पदांची ही संख्या आहे. पदे रिक्त राहिल्यामुळे कामाचा ताण उपलब्ध मनुष्यबळावर पडतो व त्याचा परिणाम म्हणून त्या कार्यालयांत जाणाऱ्या लोकांना हेलपाटे मारायची वेळ येते. त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीच ही पदे तातडीने कशी भरली जातील, याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्याातील ३६ शासकीय कार्यालयांमध्ये विविध वर्गांच्या एकूण १३ हजार ५६ मंजूर पदांपैकी १० हजार ३७१ पदे कार्यरत असून, त्यांपैकी २६८५ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये एस. टी. महामंडळाकडे ८५५ पदे रिक्त आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग येथे ५५१, पाटबंधारे कार्यालय येथे ३८९, विक्रीकर कार्यालयात २६८, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे ७६, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे प्रत्येकी ७० पदे रिक्त आहेत. जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे एकही पद रिक्त नसल्याचे दिसत आहे. सर्वांत कमी पदे रिक्त असणारे कार्यालय म्हणून जिल्हा सैनिक कार्यालयाकडे पाहावे लागेल; कारण येथे एकच पद रिक्त आहे.कार्यालयाचे नावमंजूर पदेकार्यरत पदेरिक्त पदेएस. टी. महामंडळ६१७६५३२१८५५सार्वजनिक बांधकाम विभाग८६८३१७५५१पाटबंधारे विभाग१२०७८१८३८९विक्रीकर कार्यालय५२२२५४२६८जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय७१२६३६७६जिल्हाधिकारी कार्यालय२९५२२५७०जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)१६२९२७०जिल्हा परिषद ५४१४८३५८पोलीस अधीक्षक कार्यालय१८६१६७१९जिल्हा सांख्यिकी कार्यालय १७१४०३जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय१४१३०१राज्य उत्पादन शुल्क कार्यालय१८५१४६३९सहायक जिल्हा निबंधक (मुद्रांक) ८९६६२३कार्यालयजिल्हा कोषागार कार्यालय१३०१२६०४प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)१६८१३७३१उपसंचालक, नगररचना कार्यालय२३१८०५सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन२४१६०८अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय१३११०२कार्यालयाचे नावमंजूर पदेकार्यरत पदेरिक्त पदेसहायक संचालक, जिल्हा रोजगार २४१११३व स्वयंरोजगारविशेष समाजकल्याण अधिकारी२२२००२जिल्हा उद्योग केंद्र २५१५१०जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी४५२१२४जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी२११७०४सहायक कामगार आयुक्त कार्यालय३३१६१७जिल्हा मस्त्य व्यवसाय अधीक्षक१४११०३जिल्हा दुग्धविकास अधिकारी१३०९०४जिल्हा महिती अधिकारी१८१३०५उपवनसंरक्षक, वनविभाग२८६२६८१८जिल्हा व सत्र न्यायालय७८७७८७००जिल्हा विशेष लेखापरीक्षक ९४६४३०जिल्हा कृषी अधिकारी३७ २९०८अधीक्षक, जिल्हा होमगार्ड१६ ०७०९जिल्हा सैनिक कार्यालय१८१७०१जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ०८०८००औद्योगिक प्रशिक्षण संस्था २१८१६०५८जिल्हा तुरुंग अधिकारी कार्यालय, बिंदू चौक ४५ ३८०७