कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १४ रस्त्यांच्या कामासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले असून यामध्ये ठेकेदारांना या रस्त्यांची ५ वर्षे देखभाल आणि दुरुस्ती करावी लागणार आहे.पारेवाडी-पेठेवाडी, आर्दाळ-हालेवाडी-वडकशिवाले, माद्याळ ते मेढेवाडी (ता. आजरा), पडखंबे ते रावणवाडी-खोतवाडी, वेसर्डे-अंतिवडे (ता. भुदरगड), कांबळवाडी-कळंकवाडी- धुडेवाडी, खामकरवाडी - दुर्गमानवाड, शेळेवाडी - घोटवडे, कासारवाडा-भुदरगड तालुका हद्द (ता. राधानगरी), नंदगाव-हंचनाळवाडी, (ता. करवीर), नागाव पुणेकर वसाहत, नागाव मेनन फॅक्टरी, शिरोली-माळवाडी रस्ता (ता. हातकणंगले) असे हे १४ रस्ते या योजनेतून मंजूर झाले आहेत.या सर्व रस्त्यांची लांबी ४२ किलोमीटर असून त्यासाठी २५ कोटी ८0 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अनेकवेळा रस्ते केले जातात, मात्र नंतर त्यांची देखभाल केली जात नाही. महाराष्ट्र शासनाच्या नव्या नियमावलीनुसार ज्यांनी रस्ते केले आहेत. त्यांनीच ते ५ वर्षे देखभाल आणि दुरुस्ती करावयाची असून त्यासाठी १ कोटी ३४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे वाड्या वस्तीवरच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.असे आहेत रस्तेपारेवाडी-पेठेवाडी, आर्दाळ-हालेवाडी-वडकशिवाले, माद्याळ ते मेढेवाडी (ता. आजरा), पडखंबे ते रावणवाडी-खोतवाडी, वेसर्डे-अंतिवडे (ता. भुदरगड ), कांबळवाडी-कळंकवाडी- धुडेवाडी, खामकरवाडी - दुर्गमानवाड, शेळेवाडी - घोटवडे, कासारवाडा-भुदरगड तालुका हद्द (ता. राधानगरी), नंदगाव-हंचनाळवाडी, (ता. करवीर), नागाव पुणेकर वसाहत, नागाव मेनन फॅक्टरी, शिरोली-माळवाडी रस्ता (ता. हातकणंगले)
चौदा रस्त्यांसाठी २८ कोटी रुपये मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:54 AM