ठळक मुद्देजिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 1400 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदी- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे. तुळशी नदी- बीड.वारणा नदी- चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगांव, तांदुळवाडी, चावरे, खोची, दानोळी व मांगलेसावर्डे. कासारी नदी- यवलूज, पुनाळ-तिरपन व ठाणे-आळवे. दुधगंगा नदी- दत्तवाड, बाचणी, सुळकुड व सिद्धनेर्ली असे एकूण 28 बंधारे पाण्याखाली आहेत.
- जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा तुळशी -85.42 दलघमी, वारणा -841.70, दूधगंगा झ्र 592.03, कासारी- 58.08, कडवी झ्र 71.24, कुंभी-61.09, पाटगाव- 96.12, चिकोत्रा- 39.34, चित्री - 53.41 (पूर्ण क्षमतेने भरला), जंगमहट्टी -34.65, घटप्रभा - 44.17, जांबरे- 23.23, आंबेआहोळ - 30.98 दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे.
- बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 28.7 फूट, सुर्वे 30.4, रुई 63.4, इचलकरंजी 62, तेरवाड 60.8, शिरोळ 59.6 तर नृसिंहवाडी बंधाऱ्याची 59.5 फूट इतकी पाणी पातळी सध्या आहे.