लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्या अंतर्गत गेल्या आठ दिवसांपासून २७५ जणांवर कारवाई करीत अवैध दारू संदर्भात २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
अवैध दारू, मटका, जुगार अशा अवैध व्यवसाय विरोधात गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा पोलीस दलाने धडक मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत १० ते १८ मार्च दरम्यान २८ लाखांची अवैध दारू जप्त केली आहे. या कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगार म्हणून कारवाई करण्यात आली. गार मटके संदर्भात ७० जणांवर कारवाई करण्यात आली.ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरू ठेवली जाणार आहे ,अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिली.