गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी सोमवारी २६७ उमेदवारांनी २९० अर्ज दाखल केले. आजअखेर दाखल केलेल्या अर्जांमध्ये औरनाळमधील ३६ व्यक्तींनी सर्वाधिक ४० अर्ज दाखल केले आहेत.
गावनिहाय दाखल झालेले अर्ज कंसात असे - खणदाळ, जरळी, शिंदेवाडी, जांभूळवाडी, मनवाड, निलजी (प्रत्येकी १), बुगडीकट्टी व मासेवाडी (प्रत्येकी २), चिंचेवाडी (३), नंदनवाड व बसर्गे (प्रत्येकी ४), हनिमनाळ, शेंद्री व वाघराळी (प्रत्येकी ६), हरळी बुद्रुक व मांगनूर तर्फ सावतवाडी (७), मुंगूरवाडी व तळेवाडी (प्रत्येकी ८), मुत्नाळ, इंचनाळ व वडरगे (प्रत्येकी ९), उंबरवाडी, दुंडगे व हलकर्णी (प्रत्येकी १०), लिंगनूर काा नूल, हिरलगे व हेब्बाळ काा नूल (प्रत्येकी १२), माद्याळ काा नूल (१६), हसूरचंपू (१८), ऐनापूर (२२), गिजवणे (३२) व औरनाळ (४०), चन्नेकुप्पी, तुपूरवाडी, चंदनकूड, तेरणी, दुगुनवाडी, तेगिनहाळ, हेब्बाळ जलद्याळ, अरळगुंडी, सावतवाडी तर्फ नेसरी, लिंगनूर तर्फ नेसरी, कानडेवाडी, नौकुड, शिपूर तर्फ आजरा, हुनगिनहाळ, नरेवाडी, नूल, इदरगुच्ची व बेळगुंदी या १८ गावांतून अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही.