शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

जिल्ह्यात ६७६ शेतकऱ्यांचाच पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:26 AM

नसिम सनदी। लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पीक विमा न भरणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना ...

नसिम सनदी।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पीक विमा न भरणे किती महागात पडू शकते, याची प्रचिती आता शेतकऱ्यांना येऊ लागली आहे. तीन लाखांहून अधिक शेतकºयांची पिके महापुराने कुजवली आहेत; त्यापैकी केवळ ६७६ इतक्याच शेतकºयांनी विमा उतरवल्याने ते लाभास पात्र ठरणार आहेत. उर्वरित शेतकºयांना शासनाच्या मदतीवरच विसंबून राहावे लागणार आहे.पीक नुकसानीचा निकष ५० ऐवजी ३३ टक्क्यांपर्यंत खाली आणल्याने विम्याचा लाभ घेणाºया शेतकºयांची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती, पण नेहमीप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी गाफील राहिले. प्रलयंकारी असा महापूर कोल्हापूर जिल्ह्याने अनुभवला. यात जिल्ह्यातील ३ लाख ९१ हजार ४८० पिकाखालील क्षेत्रापैकी तब्बल १ लाख ५ हजार ६९ हेक्टरवरील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली, तर उर्वरित क्षेत्रातील पिकांनाही अतिवृष्टीचा फटका बसला. उंच भागातील पिकांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी शेतकºयांना विम्याचा मोठा आधार होता, पण दुर्दैवाने कोल्हापुरातील शेतकरी त्यापासून वंचित राहणार आहेत.उंबरठा उत्पन्न जास्त असल्याने विमा हप्ता भरूनही त्याचा लाभ होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी पिकांचा विमा उतरवण्यास सहजासहजी धजावत नाहीत. यावर्षी दोन ते तीनवेळा मुदतवाढ देऊन देखील केवळ ६७६ शेतकºयांनी २७१ हेक्टरवरीलच भात, सोयाबीन, भुईमुग, ज्वारी, नाचणी या पिकाचे विमे उतरवले आहेत.नुकसानीच्या आकड्यात आणि विमाधारक शेतकºयांच्या आकड्यात फार मोठी तफावत आहे. ३ लाख १३ हजार ६१० शेतकºयांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर हा आकडा आणखी वाढणार आहे.उसाचे सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील सर्वाधिक दोन लाखांहून अधिक हेक्टरवर उसाचे पीक घेतले जाते.महापुराच्या तडाख्यात सर्वाधिक एक लाख हेक्टर नुकसान एकट्या ऊस पिकाचे झाले आहे, पण त्याचा विम्यात अंतर्भाव केला जात नाही.मध्यंतरी जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीककर्जातून विम्याची रक्कम वसूल करण्याचा निर्णय झाला, पण त्याला उत्पादकांकडूनच कडाडून विरोध झाला.आज उसाचे ७० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याने पुन्हा एकदा विम्याची गरज भासू लागली आहे.चालू वर्षी पीकनिहाय भरलेला विमापीक शेतकरी क्षेत्र(हे.) विमा हफ्ता संरक्षित रक्कमसोयाबीन १४९ ५६.६५ ४८७२१.१३ २४३६0५७.५0ज्वारी ६ २.४९ १२२३.१९ ६११५९.८४भात ४१४ १७0.८९ १४८६७५.३४ ७४३३७७१.५५भूईमुग ६७ २७.६३ १७६८१.५९ ८८४0८0.३२नाचणी ४0 १४.३१ ५२९३.५९ २६४६७९.५0एकूण ६७६ २७१.१७ २२१५९४.८४ ११0७९७४८.७१