नवे पारगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथील अंबप विकास संस्थेस ३ लाख ११ हजार नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील यांनी ८१ व्या ऑनलाईन वार्षिक सभेत दिली.
डॉ. बी. के. पाटील पुढे म्हणाले, वार्षिक उलाढाल ६ कोटी २० लाख आहे. संस्थेच्या विविध कर्ज योजनांची माहिती देऊन वेळेत कर्जफेड केल्यास शून्य टक्के व्याज दर लागणार असल्याचे सांगितले. सचिव हिंदुराव मुळीक यांनी अहवाल सादर केला.
यावेळी उपाध्यक्ष पोपट जाधव, शशिकांत पाटील, सुनील पाटील, वसंतराव विभुते, शिवाजी वाघमोडे, कृष्णात गायकवाड, महादेव माळी, कृष्णात शिंदे, जालिंदर पाटील, बाबासो डोंगरे, सुनील कानडे, संदीप अंबपकर, कविता दाभाडे, संगीता सूर्यवंशी, सुदाम पाटील, ज्ञानदेव डोंगरे, प्रदीप पाटील, मिलिंद थोरात उपस्थित होते.
फोटो ओळी : अंबप विकास संस्थेच्या ८१ व्या वार्षिक सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. के. पाटील. यावेळी ॲड. राजवर्धन पाटील, सोमराज पाटील व पोपट जाधव, आदी उपस्थित होते.