शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

३ लाखांची अवैध दारू जप्त, दाणोली बाजारपेठेतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 7:57 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी नामदेव भिमाना सावंत (४८, रा. चंदगड, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे३ लाखांची अवैध दारू जप्त, दाणोली बाजारपेठेतील घटना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई

सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी नामदेव भिमाना सावंत (४८, रा. चंदगड, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे.आंबोली घाटमार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, आर. डी. ठाकूर, एम. एस. पवार, एस. जी. मुपडे, दीपक वायदंडे यांच्या टीमने रविवारी रात्रीपासून आंबोली घाट मार्गावर सापळा रचला होता. त्यानुसार रात्री ११ च्या सुमारास या पथकाने आंबोली घाटात एका कारला (एम. एच. ४३, एल. ०८४२) या पथकाने थांबण्याचा इशारा केला होता.कारचालक चंदगडमधीलदाणोली बाजारपेठ येथे थांबवून ही गाडी तपासली असता कारमध्ये एकूण ३ लाख रुपयांची गोवा बनावटीची अवैध दारू आढळली. या दारूसह दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली २ लाखांची कार असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गोवा बनावटीची बिगर परवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक नामदेव भिमाना सावंत (रा. नागनवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग