कोल्हापूर : बाजार समितीसाठी शुक्रवारी विविध गटांतून १२४ अर्ज दाखल झाले. विकास सेवा संस्था गटातून सर्वाधिक ६२ अर्ज दाखल झाले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध गटांतून ३० अर्ज दाखल करण्यात आले. समितीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, दिनकर पाटील, बंडोपंत पाटील यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले. भाजपच्यावतीने सदानंद कोरगावकर, बाळासाहेब मनाडे, नीलेश पटेल यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवार (दि. ८) पर्यंत आहे. शुक्रवारी भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत संघटन सरचिटणीस बाबा देसाई यांच्या नेतृत्वाखाली सर्वच गटांतून अर्ज दाखल केले. के. एस. चौगले, नाथाजी पाटील, शिवाजी बुवा, संभाजी पाटील, आनंदराव पवळ, दाजी चौगले उपस्थित होते. शुक्रवारी विविध गटांतून १२४ अर्ज दाखल झाले असून, आतापर्यंत ४७८ अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल १४७५ अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असून, सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडण्याची शक्यता आहे. अनिल पोवार (बालिंगा), सर्जेराव पाटील (कोपार्डे), बंडोपंत पाटील (म्हाकवे), रामचंद्र पाटील (दिगवडे), दिनकर पाटील (आणाजे), जयवंत हिर्डेकर (बाजार भोगाव), दिनकर पाटील (कपिलेश्वर), आदींनी अर्ज दाखल केले.(प्रतिनिधी) भाजपने दाखल केलेले अर्ज -विकास संस्था - ज्ञानदेव पाटील (माणगाव), योगेश परुळेकर (पिंपळगाव), नाथाजी पाटील, रवींद्र पाटील (आकुर्डे), दिलीप चौगले (राशिवडे), रामचंद्र पाटील (बुजवडे), साताप्पा सूर्यवंशी (कासारवाडा), शिवाजी भोसले (कणेरीवाडी), दत्तात्रय पाटील (करवीर), शिवाजी खापणे (माळवाडी), रामदास चोपडे (पन्हाळा), महिपती पाटील (कुशिरे), राजाराम पाटील (कोलोली), शौकत आगा (दरेवाडी).
भाजपचे शक्तिप्रदर्शनाने ३० अर्ज दाखल
By admin | Published: June 06, 2015 12:25 AM