कोल्हापूर : कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागेचा ताबा घेण्यावरून पाच घरांवर हल्ला केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी फरारी असलेल्या आणखी चौघाजणांना गुरुवारी अटक केली. तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले जेसीबी मशीन व पाच हॉकी स्टिक, हल्ल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग फुटेज जप्त केल्या.
सूरज नलवडे
सुमारे ३० लाखांची सुपारी देऊन हा हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सूरज तानाजी नलवडे (२४, रा. शाहूनगर, राजारामपुरी), रोहन सुरेश साळोखे (३०, रा. बागल चौक), अमोल रघुनाथ पाटील (३५, रा. यादवनगर), विनोदकुमार शामलाल जसवाल (३५, रा. उत्तरप्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. २६ एप्रिल रोजी सहाजणांना अटक केली आहे; त्यामुळे अटक केलेल्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.रोहन साळोखे दरम्यान, या जागेचा ताबा जबरदस्तीने घेण्यासाठी सचिन दुर्वे याला ३० लाखांची सुपारी दिल्याचे, तर दुर्वे याने यापैकी १० लाखांची सुपारी गणेश बुचडे याला देऊन हा हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. बुचडे हा सहकुटुंब फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोटीतीर्थ मार्केटसमोरील आयर्विन ख्रिश्चन हॉस्टेल कंपाउंडमधील जागेबाबत गेले काही दिवस वाद धुमसत असतानाच गुरुवारी (दि. २५) सुमारे १५० जणांच्या जमावाने जेसीबी मशीन, तसेच हातात हॉकी स्टीक घेऊन परिसरातील घरांवर हल्ला केला.अमोल पाटील
येथील महिलांना धक्काबुक्की करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यामध्ये सहाजण जखमी झाले. जागेचा ताबा सोडण्याबाबत त्यांना धमक्या देण्यात आल्या; त्यामुळे परिसरात दहशत माजली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी राहुल जवान कवाळे, किशोर कृष्णा कलकुटगी, धनंजय महादेव गडद्यावर, सचिन एकनाथ दुर्वे, इम्रान हुसेन पठाण, पिंटू बाळासो सातपुते यांना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली.
विनोदकुमार जयस्वाल गुरुवारी सकाळी फरारी असलेल्या सूरज तानाजी नलवडे, रोहन सुरेश साळोखे, अमोल रघुनाथ पाटील या तिघांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात, तर विनोदकुमार शामलाल जयस्वाल जेसीबी चालकास गगनबावड्यातून ताब्यात घेतले.३० लाखांची सुपारीपोलिसांनी दिलेली माहिती अशी, की किशोर कलगुटकी आणि धनंजय गड्डीयावार या दोघांनी संबंधित जागा विकत घेतली आहे. ही जागा रिकामी करण्यासाठी यापूर्वी अटकेत असलेल्या सचिन दुर्वेला सुमारे ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती; त्यासाठी १० लाख रुपये आगाऊ रक्कम दिली होती. दुर्वे यांनी ही १० लाखांची रक्कम फरारी असणारा शाहूनगरातील गणेश बुचडे याला सुपारी दिली. त्यातून बुचडे याने जमाव करून हा हल्ला घडवून आणला. हल्ल्यात सहभागी महिलांना प्रत्येकी २५०० रुपये देऊन आणल्याचेही पोलिसांनी सांगितले.
सूरज नलवडेवर यापूर्वी पाच गुन्हेसूरज नलवडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नासह एकूण पाच गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राजारामपुरीतही ताबा घेण्याचा प्रयत्नआठ दिवसांपूर्वी अटकेत असलेला राहुल जवान कवाळे याने यापूर्वी राजारामपुरी आठवी गल्ली येथे एका घराचे कंपाऊंड पाडून जमिनीचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी सांगितले.