शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

३० गावांना हवेत ‘पोलीसपाटील’

By admin | Published: December 25, 2014 10:19 PM

आजरा तालुका : प्रतिष्ठेची ‘पाटीलकी’ रिक्तच

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा तालुक्यातील तब्बल ३० गावांतील पोलीसपाटलांची पदे रिक्त असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, एखादी अपघाती घटना घडल्यास पोलीसपाटलांऐवजी स्थानिक मंडळीच पोलीसपाटलांची भूमिका बजावताना दिसतात. ग्रामीण भागातील ‘पाटील’की सांभाळण्यासाठी रिक्त पदे त्वरीत भरण्याची मागणी होत आहे.आजरा तालुक्याकरिता एकूच ९४ पोलीसपाटलांची पदे मंजूर आहेत. पैकी ६४ जागांवर रितसर नेमणुका करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही ३० पदे रिक्तच आहेत. यातील काही पदे आरक्षणामुळे संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने पोलीसपाटील सेवानिवृत्त झाल्याने तर काहींची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने ते निलंबित झाल्याने रिक्त आहेत.दर्डेवाडी, वाटगी, लाकूडवाडी, किटवडे, सरोळी, बेलेवाडी, देवर्डे, मलिग्रे, झुलपेवाडी, चव्हाणवाडी, जेऊर, सरोळी, कागिनवाडी, साळगाव, मडिलगे, हाजगोळी, हरपवडे, पेरणोली, लाटगाव, उत्तूर, विटे, मुमेवाडी, आवंढी, एरंडोळ, भादवण, हारूर, दाभिल, मोरेवाडी, खेडे, सुळेरान या गावांमध्ये पोलीसपाटीलच नाहीत.पोलीसपाटील गावात नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणारी एखादी घटना संबंधित गावात घडल्यास पोलिसांपर्यंत सदर घटनेची माहिती समजण्यास बराच वेळ जातो आणि यामुळे पोलिसी तपास, कारवाई, खबरदारीचे उपाय याबाबत आवश्यक त्या हालचाली करण्यामध्ये अनेक अडचणी येतात.गावपातळीवर अनेक दाखले हे पोलीसपाटलांकडून दिले जातात. गावात पोलीसपाटीलच नसल्याने ग्रामस्थांनाही स्थानिक पातळीवर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देवर्डे, मडिलगे, सुळेरान या गावांना पोलीसपाटीलही नाही आणि ग्रामसेवकही नाही, अशी विचित्र परिस्थिती आहे.मूळ ‘देसाई’ जगले ‘पाटील’ म्हणूनचआजऱ्याचे ज्येष्ठ नेते कै. बळिरामजी देसाई यांनी अनेक वर्षे आजऱ्याची पोलीसपाटीलकी सांभाळली. यामुळे संपूर्ण तालुका त्यांना बळिराम पाटील या नावाने ओळखत असे. त्यांना स्वत:लाही या ‘पाटीलकी’चा अभिमान होता. याची जाहीररित्या ते कबुलीही देत.त्यांची ओळख ‘पाटील’ म्हणूनचग्रामीण भागामध्ये पोलीसपाटील हे पद प्रतिष्ठेचे समजले जाते. पोलीस आणि पाटील हे दोन्हीही वजनदार शब्द पोलीसपाटील या पदात असल्याने आडनाव काहीही असले तरी नकळतपणे अनेक पोलीसपाटलांना ‘पाटील’ या नावाने संबोधले जाते.