शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

कारखान्यांकडे ३०० कोटी थकीत

By admin | Published: October 04, 2015 11:20 PM

दुसऱ्या हप्त्याचे ३८० रुपये बुडविले : हंगाम २00६-0७; ९०० व ३८० अशा दोन हप्त्यांत १२८० रुपये देण्याचा फॉर्म्युला होता

प्रकाश पाटील -- कोपार्डे --साखरेचे दर घसरल्याने एफआरपी तीन टप्प्यांत देण्यासाठी सूट मिळावी असा ठराव साखर कारखानदारांनी वार्षिक सभेत करण्यास सुरुवात केली आहे. त्याला शेतकरी संघटनांंनी विरोध केला आहे. याला २००६-०७ च्या हंगामातील दोन हप्त्यांतील ऊसदर कारणीभूत आहे. कारण या हंगामातील कागलचा ‘शाहू’ कारखाना वगळता सर्वच कारखान्यांनी दुसरा हप्ताच दिला नाही. ही रक्कम जवळजवळ ३०० कोटी असून, ती अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.हंगाम २००६-०७ मध्ये साखरेचे दर पडले होते. या हंगामातही शेतकरी संघटनांनी एकरकमी ऊसदरासाठी आंदोलन उभे केले होते. राजू शेट्टी यांनी १४०० रुपये प्रतिटन, तर रघुनाथदादा पाटील यांनी १८०० रुपये प्रतिटन एकरकमी ऊसदर मिळाल्याशिवाय हंगाम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे हंगाम सुरू होण्यास मोठा अडथळा निर्माण झाला. हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता दिसताच तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी खा. राजू शेट्टी यांना बरोबर घेऊन आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वाटाघाटी सुरू केल्या. यातून १२८० रुपये प्रति मे. टन ऊसदर ठरविण्यात आला. मात्र, साखरेचे दर घसरल्याने तो एकरकमी देण्याऐवजी दोन हप्त्यांमध्ये देण्याचा करार यावेळी करण्यात आला.यामध्ये पहिला हप्ता ९०० रुपये व दुसरा हप्ता ३८० रुपये असा ९०० + ३८० = १२८० चा फॉर्म्युला होऊन तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासमोर खासदार शेट्टी, माजी खासदार मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे व जिल्ह्यातील कारखानदारांत करार करून हंगाम सुरळीत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. खा. शेट्टी यांनी हंगाम लांबत चालल्याने कारखानदारांबरोबर शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ नये यासाठी ताठर भूमिका सोडून कारखानदारांना ९०० + ३८०= १२८० प्रमाणे ऊसदर देण्यास मुभा दिली. या फॉर्म्युल्याला रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेने विरोध केला होता. मात्र, कारखाने सुरू झाल्यानंतर त्यांनीही मवाळ भूमिका घेतली.हंगाम २००६-०७ मध्ये गाळप हंगाम पूर्ण होताच साखर कारखानदारांनी आपली भूमिका बदलली. पहिला ९०० रुपयेचा प्रतिटन हप्ता सर्वच कारखानदारांनी दिला, मात्र ३८० ची दुसऱ्या हप्त्यापोटीची रक्कम आजअखेर थकीतच आहे. ही रक्कम ३०० कोटींच्या घरात आहे. छ. शाहू-कागलने मात्र ९०० + ३८० = १२८० ही पूर्ण रक्कम आपल्या ऊस उत्पादकांना दिली आहे. यानंतर याबाबत ना शासनाने, ना कारखानदारांनी, ना शेतकरी संघटनांनी आवाज उठविला आहे. हा अनुभव लक्षात घेऊनच अलीकडच्या काळात एफआरपी एकरकमी मिळावी यासाठी शेतकरी संघटना आग्रह करीत आहे. एफआरपीचा कायदा हा केंद्रीय कृषी मंत्रालय व कृषिमूल्य आयोग यांनी बनविला आहे. यामध्ये शुगरकेन कंट्रोल आॅर्डर १९६६ कलम ३ (ए) नुसार शेतकऱ्याचा ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत त्याचा एफआरपीप्रमाणे सर्व ऊसदर एकरकमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाला पाहिजे, असा कायदा आहे. अजूनही थकबाकीहंगाम २००६/०७ मध्ये ९०० व ३८० चा दोन हप्त्यांचा ऊसदर देण्याचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी माजी खासदार कै. मंडलिक व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी महत्त्वाची भूमिका घेतली होती; मात्र मंडलिक कारखान्याने १९ कोटी ८१ लाख ३७ हजार ३२०, तर आवाडे यांच्या ‘जवाहर’ने ४४ कोटी ५९ लाख ९६ हजार ८८० रुपये अशी दुसऱ्या हप्त्यापोटी द्यावी लागणारी ३८० ची रक्कम अद्यापही दिलेली नाही. वारणा कारखान्याकडे सर्वांत जास्त ४७ कोटी ७१ लाख ५८ हजार २० रुपये थकीत आहेत.केंद्राच्या कायद्यात बदल करण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यांना नाही. एफआरपीचा कायदा केंद्राने बनविला असून, तो शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून केला आहे. सध्या एफआरपी तीन हप्त्यांत देऊ असा नारा कारखानदार करीत आहेत; मात्र २००६-०७ चा अनुभव पाहता कारखानदार पुन्हा लबाडी कशावरून करणार नाहीत? ज्या कारखानदारांनी दोन खासदार, एक आमदार, जिल्हाधिकाऱ्यांसमोर झालेल्या कराराला केराची टोपली दाखवत ३०० कोटी लाटले, त्यांच्यावर काय भरवसा? आमची भूमिका एकरकमी एफआरपीचीच राहील. यासाठी आपण रस्त्यावर उतरू.- पी. जी. पाटील (अध्यक्ष, रघुनाथदादा शेतकरी संघटना, कोल्हापूर जिल्हा)२००६-०७ मधील ३८० च्या हप्त्यापोटी जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे थकीत रक्कम पुढीलप्रमाणे : कारखान्याचे नाव२००६-०७ मध्ये ३८० ची थकीतगाळप ऊस मे. टन रक्कम (कोटी)भोगावती, परिते५,४५,७२४२०,७३,७५,१२०मंडलिक, हमीदवाडा५,२१,४१४१९,८१,३७,३२०जवाहर, हुपरी११,७३,६७६४४,५९,९६,८८०दुधगंगा-वेदगंगा, बिद्री६,४२,९००२४,४३,०२,०००तात्यासाहेब कोरे, वारणा१२,५५,६७९४७,७१,५८,०२०छ. राजाराम, बावडा३,७५,३४६१४,२६,३१,४८०दत्त, शिरोळ१०,२५,२८०३८,९६,०६,४००पंचगंगा, इचलकरंजी६,४३,१९३२४,४४,१३,३४०शरद, नरंदे४,१४,७३३१५,७५,९८,५४०डी. वाय. पाटील, पळसंबे३,५५,१५३१३,४९,५८,१४०दत्त, आसुर्ले-पोर्ले१,३१,०००४,९७,८०,०००गडहिंग्लज, हरळी३,७८,३३२१४,३७,६६,१६०कुंभी-कासारी, कुडित्रे५,१४,१६२१९,५३,८१,५६०गुरुदत्त, टाकळी५,६९,९८०२१,६५,९२,४००दौलत, चंदगड५,१७,६९५१९,६७,२४,१००उदयसिंह गायकवाड, बांबवडे१,९६,२६३७,४५,७९,९४०फॉर्म्युलाखा. राजू शेट्टी, माजी खासदार कै. सदाशिवराव मंडलिक, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे, माजी आ. प्रकाश आवाडे यांनी फॉर्म्युला तयार करून कारखानदारांबरोबर केला होता करार.