संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच बैठकीत आजरा तालुक्यातील ३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन गोरगरिबांना लाभ मिळवून द्या, असे आवाहन आमदार राजेश पाटील यांनी केले. यावेळी नूतन सर्व सदस्यांचा आमदार पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आजरा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे २०५९, श्रावणबाळ योजनेचे २११७, इंदिरा गांधी विधवा व परितकत्या ५८, अपंग ११ व वृद्धापकाळ पेन्शन योजना ८४४ असे एकूण ५०८९ लाभार्थी आहेत.
सभेत ३१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांनी सर्व शासकीय योजनेच्या नियमावलीची माहिती सदस्यांना करून दिली व कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची कार्यालयाकडून दखल घेतली जाईल, असे सांगितले.
आजरा तालुका डोंगराळ आहे. त्यामुळे जास्तीत जास्त गरिबांना लाभ देऊन या योजनेमध्ये सहभागी करून घेऊया, असे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी सांगितले.
सभेला समिती सदस्य दीपक देसाई, काशीनाथ तेली, राजेंद्र सावंत, शिवाजी आढाव, एस. पी. कांबळे, रवींद्र भाटले, आशाताई चव्हाण, बयाजी येडगे, उत्तम देसाई, गटविकास अधिकारी बी. डी. वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, अव्वल कारकून संदेश बारापात्रे, लिपिक सुखदेव लुगडे उपस्थित होते. सदस्य सचिव म्हणून निवडणूक नायब तहसीलदार डी. डी. कोळी यांनी काम पाहिले.
फोटो ओळी : आजऱ्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पहिल्याच बैठकीत अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील. शेजारी एस. पी. कांबळे, राजेंद्र सावंत, शिवाजी आढाव आदी उपस्थित होते.
क्रमांक : १३०७२०२१-गड-०६