नियुक्ती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षातील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांचा या निवडीत समावेश आहे. दरम्यान चालू शैक्षणिक वर्षात लॉकडाऊन काळात १७१ विद्यार्थ्यांची जॉनडियर, एसकेएफ, महिंद्रा आणि महिंद्रा, एचसीएल, केएसपीजी ऑटोमोटिव्ह ,पॉजिओ या आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झाली आहे. कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यास नेहमी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या सुरुवातीची नोकरी मिळाल्याचा आनंद होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी माहिती प्राचार्य वाय. आर. गुरव यांनी दिली.
यावेळी ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अजय मस्के, प्रा. एफ. बी. अमीन, प्रा. एस. एफ. अमीन उपस्थित होते.
फोटो ओळी-
वाठार येथील अशोकराव माने पाॅलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य वाय. आर. गुरव यांनी केला. यावेळी एफ. बी. अमीन, अजय मस्के, एस. एफ. अमीन,बी. व्ही. कुंभार, एस. ए. लकडे, पी. टी. हसबे, एस. एन. यादव उपस्थित होते.