शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

जिल्ह्यात नवे ३१८ क्षयरुग्ण, आणखी महिनाभर सुरू राहणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2021 12:48 PM

Health Hospital Kolhapur- कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या ताज्या सर्वेक्षणामध्ये नवे ३१८ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. अजूनही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात नवे ३१८ क्षयरुग्ण, आणखी महिनाभर सुरू राहणार सर्वेक्षण मधुमेहींनी दक्षता घेण्याची गरज

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यात केलेल्या ताज्या सर्वेक्षणामध्ये नवे ३१८ क्षयरुग्ण आढळून आले आहेत. अजूनही रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता असल्याने ३१ जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने १ डिसेंबरपासून संयुक्त क्षय व कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. १५ डिसेंबर २०२० चा आढावा घेतला असता, संशयित रुग्णांच्या १० टक्के रुग्ण हे शक्यतो प्रत्यक्षात आढळतात. परंतु सध्या हे प्रमाण ५.५ टक्के आहे. त्यामुळे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश आले आहेत.केवळ एका महिन्यात ३१८ क्षयरुग्ण आढळले असून, यातील ५९ रुग्णांना फुफ्फुस सोडून अन्य अवयवांना क्षयरोगाची लागण झाली आहे, तर ९८ जणांना थुंकीवाटे प्रसारित क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याचे लवकर निदान झाल्यामुळे इतरांना या रोगाचा संसर्ग होण्यावर मर्यादा आल्या आहेत. एक्सरेच्या माध्यमातून १५२ रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.कोविडमुळे अधिक दक्षताएचआयव्ही, कोरोना झालेले, कोरोनासंशयित आणि मधुमेह असलेल्या नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे त्यांना क्षयरोग होण्याची शक्यता अधिक बळावते. गेले ९ महिने कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वजण प्रभावित झाले असताना, आता अन्य आजार होऊ नये, यासाठीही दक्षता घेण्याची गरज आहे.

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह असणाऱ्यांना अन्य आजार प्रभावित करतात, असे निरीक्षण गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांना मधुमेह आणि ज्यांना दोन, तीन दिवस सलग खोकला लागत असेल, तर त्यांनी क्षयरोगाची तपासणी करून घेणे हिताचे आहे.-डॉ. उषादेवी कुंभारजिल्हा क्षयरोग अधिकारी

नव्या क्षयरुग्णांची तालुकावार आकडेवारीअ. नं. तालुक्याचे नाव          क्षयरुग्ण१            करवीर          २७२            हातकणंगले ४७३              भुदरगड     २०४                शिरोळ     २७५           गडहिंग्लज   २६६                पन्हाळा   २०७                  कागल   ३७८                   चंदगड  २०९                राधानगरी ३०१०                शाहूवाडी १६११              इचलकरंजी २६१२              गगनबावडा २२ 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर