शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

३२ घरकुल लाभार्थी उघड्यावर

By admin | Published: October 22, 2016 12:47 AM

करवीर पंचायत मासिक सभा : लाभार्थ्यांची जुनी घरे पाडली; संबंधितांवर कारवाई करा

कसबा बावडा : इंदिरा आवास घरकुल योजनेतील ३२ लाभार्थ्यांना घरे मंजुरीचे आदेश मिळाले. त्यानंतर संबंधित गावच्या ग्रामसेवकांनी जुने घर पाडण्याबाबत सूचना केल्या. सूचनेनुसार लाभार्थ्यांनी घरे पाडली; मात्र त्यानंतर प्रस्ताव आॅनलाईन न झाल्याने घरकुल निधी मिळणार नाही, अशी उत्तरे संबंधित विभागाकडून मिळाल्याने या योजनेतील लाभार्थी आपली राहती घरे पाडून घरकुलाविना रस्त्यावर आली आहेत. याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करवीर पंचायत समितीच्या मासिक सभेत झाली. अध्यक्षस्थानी सभापती स्मिता युवराज गवळी या होत्या.करवीर तालुक्यातील ३२ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाल्याचे पंचायतच्या विभागाकडून कळविण्यात आले. त्यानुसार संबंधितांनी आपली घरे पाडून, पाया खुदाई करून घर बांधणीस सुरुवात केली. या लोकांनी हातउसने पैसे घेऊन घराचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा अनुदान मिळण्यासाठी मागणी होऊ लागली, तेव्हा लाभार्थ्यांना ३१ मार्चला आॅनलाईन अर्ज न भरला गेल्याने अनुदानाचे पैसे मिळाले नाहीत. संबंधित लाभार्थ्यांनी याबाबत करवीर पंचायतकडे तक्रारी केल्या. परंतु त्यांना दाद मिळाली नाही. याला जे जबाबदार असतील, त्यांच्यावर कारवाई करावी व त्यांच्याकडून व गटविकास अधिकाऱ्यांच्या पगारातून नुकसानभरपाईचे पैसे वसूल करावेत, अशी मागणी राजेंद्र सूर्यवंशी व दिलीप टिपुगडे यांनी केली. उपसभापती दत्तात्रय मुळीक व सचिन पाटील यांनी हा विषय उचलून धरत याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी सूचना केली.शासनाने यंदा म्हणजेच जानेवारी महिन्यापासूनच जेव्हा ऊस पिकाला पाण्याची गरज असते, त्या काळात उपसाबंदी केल्याने ऊस पीक वाळून गेले. त्याचा फटका शेतकऱ्याला आता बसणार आहे. त्यामुळे शासनाने यंदा पाणीपट्टी माफ करावी, असा ठराव शुक्रवारच्या सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.उचगावमधील जुनी अंगणवाडी पाडली आहे. नवीन अंगणवाडीचे काम रेंगाळले आहे, ते त्वरित करावे, अशी मागणी पूनम जाधव यांनी केली. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचा एकही अधिकारी करवीर पंचायतच्या मासिक सभेस उपस्थित राहत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची नोटीस प्रशासनाने काढावी, अशी मागणी दिलीप टिपुगडे यांनी सहायक गटविकास अधिकारी ए. व्ही. केळकर यांच्याकडे केली. तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये चुकीचे काम करणाऱ्या ज्या ग्रामसेवकांवर तक्रार होती, असे ग्रामसेवक प्रशासनाने निलंबित केल्यामुळे दिलीप टिपुगडे यांनी प्रशासनाचे आभार कुरुकली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी कुरुकली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजुरी मिळाली असून, निधीही मंजूर झाला असल्याची माहिती करवीरचे आरोग्य अधिकारी डॉ. जे. डी. नलवडे यांनी दिली. सध्या संबंधित गावात जागा मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रश्नही येत्या काही दिवसांत सुटेल, असेही ते म्हणाले. मानले.