शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Kolhapur: गरिबांच्या घरकुलांसाठी मिळाली ४ हजार टन वाळू, महापूर नियंत्रणाअंतर्गत वाळू धोरणाची अंमलबजावणी 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 16, 2025 18:57 IST

इंदुमती गणेश कोल्हापूर : गेल्यावर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणाचा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांना फायदा झाला. ...

इंदुमती गणेशकोल्हापूर : गेल्यावर्षी राज्य शासनाने जाहीर केलेल्या वाळू धोरणाचा जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांना फायदा झाला. पाटबंधारे विभागाने महापूर नियंत्रणाअंतर्गत प्रस्तावित केलेल्या शिरोळमधील अर्जुनवाड, ढालवाड व शेडशाळ या तीन ठिकाणांहून ४ हजार ११३ टन वाळूचा उपसा करण्यात आला आहे. याची मुदत १० जून रोजी संपत आहे.

मात्र, यंदाच्या वाळू धोरणात महापूर नियंत्रण विषयाचा समावेश नाही, तसेच बारमाही वाहत्या नद्या असल्याने जिल्ह्यात वाळू उपसा होणार नाही, ही पर्यावरणाच्या दृष्टीने सकारात्मक बाब ठरली आहे.नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा केल्याने माेठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास हाेत आहे. दुसरीकडे यानिमित्ताने वाळूची तस्करी, बेकायदेशीर वाहतूक आणि त्याअनुषंगाने गुन्ह्यांमध्ये वाढ, शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले असे अनेक प्रकार घडले आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने दोन वर्षापूर्वी वाळू धोरण जाहीर केले. वर्ष २०२३ मध्ये जाहीर केलेल्या वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत १० जूनच उजाडला. त्यामुळे पहिल्या वर्षी मोजक्या जिल्ह्यांमध्ये शासकीय दरात वाळू उपसा झाला.जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड, ढालवाड व शेडशाळ या तीन ठिकाणांहून ४ हजार ११३ टन वाळूचा उपसा करून ताे प्रधानमंत्री आवास योजनेतील ३२४ जणांच्या घरकुलासाठी देण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत परवानगीकोल्हापुरात दरवर्षी सगळ्या नद्यांना पूर येतो. वाळू धोरणात मागील वर्षीपर्यंतच्या अधिसूचनेत महापूर नियंत्रणासाठी नदीपात्रातील गाळ, वाळू उपश्याला परवानगी देण्यात आली. त्यानुसार पाटबंधारे विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे जिल्ह्यातील शिरोळमधील वरील तीन गावांच्या ठिकाणी वाळू, गाळ उपश्याची परवानगी मागितली. जिल्ह्यात वरील तीन ठिकाणांवरील डेपोंमधून ७२०० टन वाळूला मागणी नोंदवली गेली. त्यापैकी ४ हजार ११३ टन वाळू ६०० रुपये प्रतिब्रास याप्रमाणे लाभार्थ्यांना विकण्यात आली.

काय आहे यंदाचे धोरण?नव्या वाळू धोरणात आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत वाळू, गाळ उपश्याचा समावेश नाही. बारमाही वाहत्या नद्यांमधील वाळू उपसा करायचा नाही हा कायदा असल्याने जिल्ह्यात यंदा वाळू उपसा होणार नाही.

वाळू धोरणात महापूर नियंत्रणाच्या तरतुदीचा समावेश नाही. शासनाने कृत्रिम वाळू उपश्याला प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवातीला २० टक्के आणि नंतर १०० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे निर्देश दिले आहेत. - आनंद पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना