शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासचा नवा प्रमुख याह्या सिनवारचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला; दातांनी ओळख पटली नाही म्हणून बोटांनी...
2
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
3
जिंकलंस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
4
घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे
5
सायकलस्वाराला वाचवताना भीषण अपघात, ५३ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कोसळली नदीत
6
"विलेपार्लेची जागा शिंदेगटाला सोडा", माजी मंत्री दीपक सावंत यांनी घेती जे. पी. नड्डा यांची भेट
7
ESIC बाबत सरकारचा मोठा निर्णय, PMJAY सोबत आणण्यास मंजुरी, कोणाला होणार फायदा?
8
आचारसंहितेमुळे योजनादूतांमार्फत प्रचार थांबवा; आयोगाची सूचना 
9
Rishabh Pant चुकला; त्याची विकेट वाचवण्यासाठी Sarfaraz Khan उड्या मारत ओरडताना दिसला
10
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे नेते"; पटोलेंच्या विधानावर राऊत म्हणाले, "त्यांच्या परवानगी शिवाय..."
11
पवार, फडणवीस यांच्या भेटीसाठी इच्छुकांची तोबा गर्दी
12
भारताने पाकिस्तानात खेळावे, रहायला खुशाल भारतात जावे; व्याकुळलेल्या शेजाऱ्याचा चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पुन्हा नवा फॉर्म्युला
13
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
14
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
15
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
16
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
17
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
18
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
19
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
20
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."

३२९ कोटींच्या आराखड्यास मंजुरी

By admin | Published: May 08, 2016 12:53 AM

चंद्रकांतदादा : खर्चाचे नियोजन करा; जिल्हा नियोजन समितीची बैठक

कोल्हापूर : चालू आर्थिक वर्षासाठी ३२९ कोटी १२ लाखांच्या जिल्हा नियोजन विकास आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराबाई सभागृहात शनिवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यातील माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार सर्वश्री. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, सुरेश हाळवणकर, सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, अमल महाडिक, सत्यजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, ‘समाजकल्याण’चे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेमध्ये कृषी व संलग्न सेवा, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, सामाजिक व सामूहिक सेवा, ऊर्जा, उद्योग, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवांसाठी तरतुदी आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्णास जिल्हा वार्षिक योजना आराखड्यांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीच्या खर्चाचे आतापासूनच नियोजन करावे, अशी सक्त सूचना करून ते म्हणाले, पहिल्या चार महिन्यांत निधीचा कामनिहाय आराखडा आणि सर्व मान्यता घेण्याच्या दक्षता सर्व विभागांनी घ्याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.