एकनाथ पाटील।कोल्हापूर : अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमिष दाखवून गेल्या वर्षभरात कोल्हापूर परिक्षेत्रात बलात्काराचे ३३२ गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.
बारा वर्षांखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यात (पॉक्सो) बदल करण्याचा निर्णय झाल्याने आता नराधमांना जन्मठेप नाही, तर थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार आहे. या कायद्यामुळे लहान मुलांचे आयुष्य सुरक्षित राहणार आहे.
जम्मू-काश्मीर येथील कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेने देश हादरून गेला; म्हणून १२ वर्षांच्या आतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाºया आरोपीस मृत्युदंड देण्याचा वटहुकूम राष्ट्रपतींनी जारी केला होता. बालकांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना सुन्न करणाºया ठरत असल्याने केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी ‘पॉक्सो’ कायद्यामध्ये बदल करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात बदल करून नराधमांना फाशीची कठोर शिक्षा देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात वर्षभरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या किती घटना घडल्या, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेतली असता धक्कादायक आकडेवारी पुढे आली. वीटभट्टी, ऊसतोड मजूर, सेंट्रिंग व्यवसाय, झोपडपट्टीसह मध्यम व उच्च राहणीमान असलेल्या वस्त्यांमध्ये अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटना जास्त आहेत. जवळच्या आणि विश्वासातीलच व्यक्तींकडूनच अशा घटना घडत आहेत. परिक्षेत्रात कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ या वर्षभराच्या कालावधीत तीन ते चौदा वर्षांपर्यंतच्या ३३२ बालिकांवरही खाऊचे आमिष दाखवून अतिप्रसंग करण्याच्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. पुणे ग्रामीणपाठोपाठ सोलापूर ग्रामीणमध्ये अत्याचारांचे प्रमाण वाढते आहे. या गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होत होती; तर काही आरोपी पुराव्याअभावी निर्दोष सुटत होते; परंतु पॉक्सो कायद्यात बदल होऊन बालकांवर अत्याचार केल्यास थेट फाशीची शिक्षा ठोठावली जाणार असल्याने अशा विकृतीच्या नराधमांना चांगलाच चाप लागेल.
या कायद्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. आजपर्यंत अनेकदा कायदे होतात, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. तसे होऊ नये यासाठी या कायद्याबाबत सजगता वाढविणे आवश्यक आहे, तरच त्याचा प्रभावी अंमल होऊ शकेल.- अतुल देसाई, बालहक्कचळवळीतील कार्यकत्कायदे करून अत्याचार थांबणार नाहीत. त्यांची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. पॉक्सो कायद्यातील नव्या बदलामुळे अशा घटनांना चाप बसेल.- अॅड. शिवाजी राणे, ज्येष्ठ विधिज्ञ, कोल्हापूरलहान मुलांवर अत्याचार करणाºयाला मृत्युदंड ठोठावण्याचा घेतलेला निर्णय हा अभिनंदनीय आहे. यापुढच्या काळात तरी लहान, शाळकरी मुलामुलींचे बाल्य हे सुरक्षित राहील, असा विश्वास वाटतो. या अतिशय आवश्यक असणाºया कायद्यामुळे नवी पिढी अत्याचारापासून अधिक सुरक्षित असेल.- डॉ. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ साहित्यिक, बालशिक्षण तर्ज्ज्ञो