शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जिल्ह्यासाठी मिळाले ३४ कोटींचे नवे चलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 1:04 AM

बँकांना आज वितरण : व्यवहारांना मिळणार गती; ग्राहकांच्या रांगा कायम

कोल्हापूर : दोन आठवड्यांनंतर रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकांसाठी गुरुवारी सुमारे ३४ कोटी रुपयांचे नवीन चलन मिळाले. त्याचे वितरण आज, शुक्रवारी दुपारपर्यंत बँकांच्या शाखांना होईल. नवे चलन मिळाल्याने बँकांमधील व्यवहारांना शुक्रवारपासून गती मिळणार आहे.जुन्या ५०० व १००० च्या नोटा रद्दचा निर्णय होऊन ४५ दिवस उलटले आहेत; पण बॅँकांतून पैसे मिळण्याची स्थिती फार सुधारलेली नाही. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध बँकांच्या करन्सी चेस्टला पाच ते १० कोटी रुपयांचे चलन मिळाले होते. या दरम्यानच नोकरदारांचे वेतन आणि सेवानिवृत्तीची पेन्शनदेखील बँकांमध्ये जमा झाली होती. त्यामुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांचा ओघ वाढला. या तुलनेत उपलब्ध चलन कमी असल्याने बँकांनी पैसे देण्याची मर्यादा कमी केली. पुरेसे चलन उपलब्ध व्हावे यासाठी करन्सी चेस्टकडून प्रयत्न सुरू झाले; पण नव्या चलनासाठी त्यांना दोन आठवडे प्रतीक्षा करावी लागली. करन्सी चेस्टना गुरुवारी दुपारी सुमारे ३४ कोटींचे चलन प्राप्त झाले. यामध्ये काही प्रमाणात नाणीदेखील आहेत. सायंकाळपर्यंत चलन ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. चलन मिळाल्याने बहुतांश बँकांना आर्थिक स्वरूपातील दिलासा मिळाला आहे. आज, शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील विविध बँकांच्या शाखांमध्ये थोड्या-अधिक प्रमाणात या चलनाचे वितरण होईल. चलन मिळाल्याने बँकांमधील व्यवहारांची गती वाढणार असून, काही बँकांची एटीएमही सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चलन उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पैसे काढण्यासाठी बँकांमधील गर्दी आणि सुरू असलेल्या एटीएमबाहेरील रांगा गुरुवारीही कायम होत्या. (प्रतिनिधी)‘सीडीएमए’द्वारे पैसे स्वीकारणे बंदजिल्ह्यातील काही बँका आपल्या सीडीएमए यंत्राच्या माध्यमातून रद्द झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा जमा करून घेत होत्या; पण गेल्या तीन दिवसांत या नोटा स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून आलेल्या सूचना लक्षात घेऊन काही बँकांनी आपल्या शाखांमध्येच रद्द नोटा जमा करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी विविध ठिकाणी असलेली आपली सीडीएमए यंत्रे बंद ठेवली आहेत. त्यामुळे नागरिकांना आता रद्द झालेल्या नोटा बँकेमध्येच जमा कराव्या लागणार आहेत.पोलिस प्रशासनाकडून आढावाजिल्ह्यातील विविध बँकांकडे उपलब्ध असलेले चलन व जमा झालेले चलन, आदी स्वरूपांतील माहिती जिल्हा पोलिस प्रशासनाने बुधवारी घेतली आहे. ४कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने संबंधित स्वरूपातील माहिती घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.