शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ बालविवाह उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:55 AM

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पौगंडावस्थेत मुला-मुलींमध्ये निर्माण होणारे आकर्षण आणि त्यातून पडणारे वाक डे पाऊल, मुलींची असुरक्षितता व बदनामी रोखण्यासाठी बालविवाहाचे चुकीचे पाऊल उचलले जात आहे. वर्षभरात ‘चाईल्ड लाईन’ने बालविवाहाची ३५ प्रकरणे उघडकीस आणली असून, हे प्रमाण ग्रामीण भागात व शहरातील झोपडपट्टी परिसरात अधिक आहे.कोल्हापुरात नुकतीच बालविवाहाची प्रकरणे उघडकीस आली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांचे प्रबोधन आणि कायदा करूनही बालविवाह रोखण्यात व्यवस्थेला यश आलेले नाही. यामागील कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न ‘चाईल्डलाईन’ने केला आहे. ‘सोळावं वरीस धोक्याचं’ अशी एक म्हण आहे; कारण वय वर्षे १४ ते १७ या कालावधीत मुला-मुलींमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल होत असतात.या किशोरावस्थेत मुला-मुलींना एकमेकांविषयी आकर्षण वाटत असते. त्यातून दोघांचेही चुकीचे पाऊल पडते. पळून जाऊन लग्न करण्यापर्यंतच्या गोष्टी घडतात. असे काही घडू नये, आपल्या मुलीची व कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून पालक स्थळ बघून मुलीचे लग्नउरकून टाकतात. एकदा का मुलीचे लग्न झाले की आपण सुटलो, अशी पालकांची भावना असते.अलीकडे मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे वाढते प्रमाण पाहता लग्न करणे हा खबरदारीचा उपाय मानला जातो. हे प्रमाण ग्रामीण आणिशहरातील झोपÞडपट्टी भागांत जास्त आहे.शारीरिक,मानसिकदृष्ट्याही अक्षमपौगंडावस्थेत मुला-मुलींचा शारीरिक व मानसिक विकास झालेला नसतो. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घेण्यासाठी ते सक्षम नसतात. त्यामुळे या वयात झालेल्या विवाहानंतर दोघांवर अनेकदा पश्चात्तापाचीच वेळ येते. त्यामुळे शासनाने मुलींसाठी १८ आणि मुलांचे २१ हे सज्ञान वय धरले असून, त्या दृष्टीने ‘पोस्को’सारखे कायदे बनविण्यात आले आहेत. त्यात अडकले की दोघांचे आणि कुटुंबीयांचेही आयुष्य पणाला लागते.समुपदेशन आणि सक्षमीकरण हाच उपायसगळ्या घटनांपासून मुलीला वाचवायचे असेल तर बालविवाहासारखे चुकीचे पाऊल उचलण्याऐवजी किशोरावस्थेतच मुला-मुलींचे समुपदेशन, या वयात होणारे बदल, भविष्यातील धोके, करिअर याविषयी कौटुंबिक, शाळा व महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन होणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांची यात महत्त्वाची भूमिका असते. मुलीचे शिक्षण आणि करिअरइतकेच प्रसंगी तिला समोर ठाकलेल्या परिस्थितीशी दोन हात करता आले पाहिजेत, इतके सक्षमीकरण हा उपाय ठरणार आहे. मुलींनीही सावध राहिले पाहिजे. गरज वाटली तर समुपदेशनासाठी १०९८ या ‘चाईल्ड लाईन’च्या क्रमांकावर संपर्क साधला पाहिजे, असे मत समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी व्यक्त केले.अत्याचारांचेवाढते प्रमाणएकीकडे स्त्री-पुरुष समानतेसाठी शासन व सामाजिक संस्थांकडून प्रबोधन आणि प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे भेदाभेदांची दरी वाढत चालल्याचे चित्र आहे. लहान मुलींपासून ते युवती, महिलांवर होणाºया अत्याचाराचा वाढता आलेख आहे. छेडछाड, पाठलाग करणे, टवाळखोरी, मुलीला असुरक्षित वाटेल अशी वर्तणूक, विनयभंग, बलात्कार, हत्या अशा घटनांमुळे ग्रामीणच नव्हे तर शहरातील पालकांमध्येही मुलीच्या असुरक्षिततेची भावना प्रचंड आहे. तिच्या सुरक्षिततेसाठी लवकर लग्न करणे हा उपाय मानला जातो.