शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Crime News kolhapur: चंदुरात चिमुकलीवर ३६ वर्षीय नराधमाकडून अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 12:29 PM

चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून एका यंत्रमाग कारखान्याच्या जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला.

इचलकरंजी : चंदुर (ता हातकणंगले) येथील शाहूनगर परिसरातील ३६ वर्षीय नराधमाने सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला. कपिल अशोक हत्तलगे असे त्याचे नाव आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दरम्यान, परिसरातील तरुणांनी त्याच्या घरावर हल्ला करत साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शाहूनगर गल्ली नंबर ३ मध्ये राहणारा कपिल हा विवाहित असून त्याला तीन मुली आहेत. तो परिसरातील एका यंत्रमाग कारखान्यात कामगार आहे. काल मंगळवारी दुपारी संशयिताने एका चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून एका यंत्रमाग कारखान्याच्या जवळ नेऊन तिच्यावर अत्याचार केला.पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने तिने हा प्रकार घरी सांगितला. त्यानंतर बुधवारी तिला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. ही माहिती समजताच परिसरातील तरुणांनी कपिलचा शोध घेतला, परंतु तोपर्यंत तो पसार झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्याच्या घरावर हल्ला करत साहित्याची तोडफोड केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिततावर पोकसो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस