राम मगदूमगडहिंग्लज : गेल्या निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर न केलेल्या जिल्ह्यातील 367 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकार्यांनी पुढील 5 वर्षांकरिता निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.2015 मध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या.निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी निकालानंतर 30 दिवसाच्या आत त्यांनी आपल्या खर्चाचा हिशेब देणे आवश्यक होते.परंतु, संबंधित सदस्यांनी आपला हिशेब वेळेत सादर केला नव्हता.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. परंतु, त्यासाठी घेतलेल्या सुनावणीलाही ते गैरहजर राहिले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुढील पाच वर्षांकरिता अपात्र ठरवले आहे.त्यामुळे ही निवडणुक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांची घोर निराशा झाली आहे.
- जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती -1025
- निवडणुक लागलेल्या ग्रामपंचायती - 433
- मागील निवडणुकीत अपात्र ठरलेल्या सदस्यांची संख्या
तालुकानिहाय अशी :कागल(१००),शाहूवाडी(९६)करवीर(८२),पन्हाळा(७५),भुदरगड(१३),हातकणंगले(१) एकूण - ३६७
६ तालुक्यातील एकही सदस्य अपात्र ठरला नाही !गडहिंग्लज, आजरा, चंदगड, शिरोळ, गगनबावडा व राधानगरी