सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी सुधारित अंदाजपत्रकानुसार महसुली जमा रुपये ६ कोटी ४९ लाख २८ हजार ८८७ रुपये तर महसुली खर्च ५ कोटी ९३ लाख ४९ हजार ५९६ असा होणार आहे आणि भांडवल रूपाने २९ कोटी २ लाख ९५ हजार १२४ रु. जमा आणि भांडवली खर्च २१ कोटी ४१ लाख ९४ हजार ६५१ रू. होणार आहे तर सन २०२१-२२ साठी महसुली जमा रुपये ७ कोटी ३१ लाख ४० हजार १०५ महसुली खर्च ७ कोटी २९ लाख १७ हजार २०९ असा होणार आहे तर भांडवली जमा ३१ कोटी ५५ लाख ५४ हजार ३६० तर भांडवली खर्च २९ कोटी ५३ लाख ९० हजार होणार आहे. मुख्य लेखापाल अनिकेत सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प मांडला.
याशिवाय नैसर्गिक आपत्ती किंवा कोविडसाठी पाच लाखांची तरतूद करावी, अशी मागणी जयसिंग भोसले यांनी केली तर अग्निशमन गाडी वर झालेल्या खर्चावर राहुल वंडकर यांनी शंका उपस्थित केली तर कोणत्याही परिस्थिती या महिन्याभरात शववाहिका खरेदी करा त्यासाठी तरतूद करा, अशी मागणी धनाजी गोधडे यांनी केली तर पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी राऊत यांनी केली तर मराठी शाळेचे नाव ‘शिवाजी विद्यामंदिर’ यावरून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर’ करावे, अशी मागणी उपनगराध्यक्षा हेमलता लोकरे यांनी केली.
सभागृहाला मुख्याधिकारी संजय गायकवाड, प्रशासन प्रमुख स्नेहल पाटील, अनिकेत सूर्यवंशी, जयवंत गोधडे, रणजित निंबाळकर, मारुती शेट्टी, दिलीप कांबळे, रमेश मुन्ने, स्वप्निल बुचडे, ज्योती पाटील, सुनील पाटील,यांनी प्रशासकीय माहिती पुरविली. अहवाल वाचन प्रशासन प्रमुख स्नेहल पाटील यांनी केले.
पालिकेचा फोटो वापरावा