कोल्हापूर : खोट्या सह्या करून धनादेश वटवणे, कर्मचाऱ्यांची खोटी पगारपत्रके तयार करणे आदी प्रकरांतून येथील राजारामपुरीतील सिटी हॉस्पिटल प्रशासनाची सुमारे ४ लाख ८७ हजार ३२५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या अपहारप्रकरणी व्यवस्थापनाने दिलेल्या तक्रारीनुसार राजारामपुरी पोलिसांनी तिघा कर्मचाऱ्यांना अटक केली.
अटक केलेल्या संशयितांची नावे अशी : अजित मारुती पाटील (वय ३०, रा. खुपिरे, ता. करवीर), संदीप किसन पाटील (३५, रा. पाट पन्हाळा, ता. पन्हाळा), प्रसाद नारायण कनबरकर (३८, रा. साळोखे पार्क, कोल्हापूर).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील राजारामपुरी सातव्या गल्लीतील सिटी हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळ व्यवस्थापकपदी अजित पाटील, तर लेखापालपदी संदीप पाटील व प्रसाद कनबरकर हे आहेत. या तिघांनी २०१३ पासून आजपर्यंत सिटी हॉस्पिटलमधील स्टाफची खोटी पगारपत्रके तयार केली, खोट्या सह्या करून धनादेश वटवले, कर्मचारी स्टाफची खोटी पगार स्लीप तयार करून सुमारे ४ लाख ८७ लाख ३२५ रुपयांची फसवणूक करून पैशांचा अपहार केला. तसेच त्यांनी हॉस्पिटलच्या हितास बाधा येईल, असे वर्तन केले, अशी फिर्याद सिटी हॉस्पिटलचे मालक डॉ. अर्चना वीरेंद्रसिंह पवार ( रा. राजारामपुरी, ८ वी गल्ली) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली, त्यानुसार तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली.
फोटो नं. ०७०३२०२१-कोल-अजित पाटील (आरोपी)
फोटो नं. ०७०३२०२१-कोल-संदीप पाटील (आरोपी)
फोटो नं. ०७०३२०२१-कोल-प्रसाद कनबरकर (आरोपी)