कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्"ात वळवाने लावलेल्या हजेरीने ३९ लाख ७७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये राधानगरी तालुक्यातील २६५ घरांची पडझड होऊन सर्वाधिक २७ लाखांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून जिल्"ात वळवाने हजेरी लावली आहे. वादळी पावसाबरोबर सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामध्ये घरांची पडझड, घरांचे छप्पर उडून जाणे, ट्रकवर झाड कोसळून नुकसान गोठ्यांंचे नुकसान, विजेच्या धक्क्याने नागरिकांसह म्हशींचा मृत्यू आदींचा समावेश आहे. २९ एप्रिलला सरासरी १.१० मिलीमीटर पाऊस पडला. ३ मे रोजी ३.२४ मि.मी. व ४ मे रोजी ४.५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ३ मे रोजी पडलेल्या वळिवामध्ये वरेवाडी (ता. शाहूवाडी)तील तीन घरांचे पत्रे उडून ५ हजारांचे नुकसान झाले. मांजरी (ता. शाहूवाडी) येथे सुभाष लगडे यांच्या गोठ्यात वीज पडून दोन म्हशी मृत्युमुखी पडल्याने ३० हजारांचे व गवत पेटल्याने ७० हजारांचे नुकसान झाले. केकतवाडी (ता. करवीर) येथील कृष्णात यादव यांच्या घराचे छप्पर उडाल्याने २० हजारांचे नुकसान झाले. पंडेवाडी (ता. राधानगरी) येथे १२ घरांचे अंशत: नुकसान व ढेंगेवाडी (ता. राधानगरी) येथील २ ट्रकवर झाड कोसळून सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले. ४ मे रोजी झालेल्या वळिव पावसाने तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात पाणी शिरून ३९ हजारांच्या साहित्याचे मलकवाडी (ता. चंदगड) येथे घराचे पत्रे उडून ४० हजारांचे नुकसान झाले. मुळवडे (ता. शाहूवाडी) येथील सयाजी दगडू पाटील यांच्या घराचे छप्पर उडून अंदाजे ५० हजारांचे, बालिंगा (ता. करवीर) येथील ४ घरांचे पत्रे उडून अंदाजे ८८ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. त्याबरोबरच शिरोळ तालुक्यातील ८७ घरांचे पत्रे उडून अंशत: पडझड होऊन ५ लाख ३५ हजार व तारदाळ (ता. हातकणंगले) येथील ५ घरांचे अंशत: नुकसान होऊन १ लाख रुपये तसेच खोतवाडी (ता. हातकणंगले) येथील तीन घरांची पडझड होऊन ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. राधानगरी तालुक्यातील २६५ घरांची अंशत: पडझड होऊन २७ लाखांचे नुकसान झाले.
वळिवाने जिल्"ात ४० लाखांचे नुकसान
By admin | Published: May 05, 2017 10:31 PM