शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

जिल्ह्यातील ४० शाळा अनुदानास पात्र

By admin | Published: August 11, 2015 12:44 AM

शासनाचा निर्णय : आरक्षणानुसार भरतीची अट; अनेक वर्षांची अनुदानाची प्रतीक्षा संपणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील ४० शिक्षण संस्था अनुदानास पात्र ठरल्या आहेत. यामुळे अनेक वर्षांपासूनची अनुदानाची प्रतीक्षा संपणार आहे. शासन नियमानुसार त्यांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ आॅगस्टला शासन निर्णय घेऊन पात्र संस्थांची नावे जाहीर केली आहेत. शासनाने २००१ मध्ये कायम विनाअनुदानित तत्त्वावर राज्यातील सुमारे दोन हजार प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना परवानगी दिली. यानंतर या शाळांकडून शासनाकडे अनुदानाची मागणी होऊ लागली. त्यामुळे शासनाने २००९ मध्ये ‘कायम’ शब्द वगळला. यानुसार २०१२-१३ पासून मूल्यांकनात निकष पूर्ण करणाऱ्या शाळा अनुदानास पात्र ठरविल्या जात आहेत. दरम्यान, शासन निर्णय १५ नोव्हेंबर २०११ नुसार मूल्यांकनासाठी अर्ज करताना शाळांमध्ये कर्मचारी नियुक्ती करताना आरक्षण धोरणाचा अवलंब करणे बंधनकारक केले. या शासन निर्णयाला विनाअनुदानित संस्थांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. यावर सुनावणी होऊन, मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या तारखेपूर्वी आरक्षणाचा अवलंब केला नसल्यास अनुदानास अपात्र ठरविता येणार नाही, असा निर्णय ७ जानेवारी २०१५ रोजी उच्च न्यायालयाने दिला. यावर मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर आरक्षण धोरणाचा अंमल करणे बंधनकारक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर संबंधित शिक्षण संस्थांची पुणे शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी सुनावणी घेतली. या सुनावणीत पात्र असलेल्या शिक्षण संस्था अनुदानास पात्र ठरविल्या आहेत. पात्र ठरलेल्या शाळांना शासन नियमानुसार २०, ४०, ६०, ८०, १०० अशा टप्प्यांत अनुदान देण्यात येणार आहे.अनुदानास पात्र शैक्षणिक संस्था आदर्श विद्यालय इसापूर, आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगाव, श्री शाहू विद्यालय कासारवाडा, माध्यमिक विद्यालय पाडळी, लक्ष्मीनारायण हायस्कूल पुंगाव, रोझरी शिक्षण प्रसारक मंडळाचे वाटंगी हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल नवीन राजापूर, पट्टणकोडोली, न्यू इंग्लिश स्कूल उंदरवाडी, माध्यमिक विद्यालय मोहाडे-चापोडे, न्यू माध्यमिक विद्यालय उचगाव, राष्ट्रीय विद्यालय तमदलगे, कवणे माध्यमिक विद्यालय, कै. दारकालिंग हायस्कूल शिंदेवाडी, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय केंबळवाडी, सांगवडे माध्यमिक विद्यालय, नवे दानवाड हायस्कूल, न्यू हायस्कूल राशिवडे बुुद्रुक, महाराष्ट्र जमात जनता सेवक संघ पेठवडगाव, स्वामी समर्थ विद्यामंदिर कणेवाडी, शिवराय हायस्कूल सातर्डे, भगवानराव घाडगे हायस्कूल चिंचवाड, राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी, शिवराज विद्यालय महिपाळगड, ए. वाय. पाटील विद्यालय कानोली तर्फ असंडोली, दत्त विद्यालय हलसवडे, सह्याद्री विद्यानिकेतन माले, सिद्धेश्वर विद्यालय शिवारे-माणगाव, यशवंतराव भोसले विद्यालय खडकेवाडा, न्यू हायस्कूल हुपरी, माध्यमिक विद्यालय माळवाडी-कानोली, ज्ञानविज्ञान विद्यालय गणेशवाडी, कासारवाडी हायस्कूल, माध्यमिक विद्यालय दऱ्याचे वडगाव, प्रा. एन. डी. पाटील विद्यालय तळगाव, सौ. सुनीतादेवी सोनवणी ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर, स्वप्नजा विद्यालय आकुर्डे, वासनोली विद्यालय कुंभारवाडी.